विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने शनिवारी (१५ जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. मागील दहा दशकात तो कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आणि कर्णधार असल्याचे सिद्ध झाले. पण कोहलीला कधी शांत कर्णधार मानले गेले नाही. कारण विराट प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रीया देत असतो. संघाच्या बाजूने बोलताना कोहली मैदानात रागवतो, विरोधी पक्षाशी भांडतो आणि कधीकधी तर पंचासोबतसुद्धा वाद घालतो. या कारणांमुळे तो बऱ्याचदा वादात अडकला आहे.
या लेखात आपण त्याच्या कारकिर्दीतील काही वादांवर नजर टाकणार आहोत.
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव
डीआरएसवरुन भडकला होता कोहली
नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये केपटाउन येथे कसोटी सामना पार पडला. या सामन्यात अश्विनच्या चेंडूवर डीन एल्गरला पायचित दिले होते. यावर एल्गारने डीआरएस घेतला आणि तो थोडक्यात बचावला होता. याचे पंचांनाही आश्चर्य वाटले होते. ते अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कोहली भडकला होता. तो स्टंप माइकच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुमच्या संघावर लक्ष केंद्रित करा आणि सोबतच चेंडू चमकवा. फक्त विरुद्ध संघावर लक्ष देवू नका. प्रत्येकवेळी लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत आहात. यावरुन कोहलीवर जोरदार टीका झाली.
कोहली विरुद्ध कुंबळे
२०१६ मध्ये अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, तेव्हा सर्वांना वाटले की त्याचा शांतपणा आणि कोहलीची आक्रमकवृत्ती मिळुन भारतीय संघाला अजुन पुढे नेईल. प्लेइंग इलेवन, संघासोबत प्रेयसीला आणि पत्नीला परदेश दौऱ्यावर सोबत ठेवण्याशिवाय सामन्यातील योजनांमुळे दोघांमध्ये बरेच मतभेद होते. यामुळे शेवटी कुंबळेला त्याचे प्रशिक्षकपद सोडावे लागले.
ऑस्ट्रेलियात टीम पेनसोबतचा वाद
२०१८-१९ चा ऑस्ट्रेलिया दौरा हा भारत आणि विराटसाठी सर्वात संस्मरणीय दौरा आहे. या दौऱ्यात कोहलीने इतिहास रचला होता. कोहली ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला होता. या मालिकेत क्रिकेटशिवाय अनेक गोष्टी घडल्या, ज्यांच्यामुळे कोहली चर्चेत राहीला. कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेन यांच्यात शाब्दिक युद्ध झाले होते. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सेलिब्रेशन करताना कोहलीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भडकवले, असे मत टीम पेनचे होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला स्लेजिंग आणि चेष्टेचा अवलंब करावा लागला. पेनला कोहलीशिवाय रिषभ पंतनेही टोमणे मारले होते.
जेम्स अँडरसनशी वाद
भारतीय क्रिकेट संघ गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तिकडे लॉर्ड्स येथे मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला गेला. त्या सामन्यादरम्यान कोहली आणि अँडरसनमध्ये वाद झाला होता. अँडरसन गोलंदाजी करून परत जात असताना कोहलीला शिवीगाळ केली होती. यावर कोहली संतापला आणि त्याने चोख प्रत्युत्तर दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या उत्तराधिकारीचे नाव निश्चित, मग बीसीसीआय कधी करेल अधिकृत घोषणा? तारिख आली पुढे
“एक गोष्ट खात्रीशीर सांगू शकतो की…”, विराटच्या निर्णयावर बालपणीच्या प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रीया
मी असा नाही..! नेतृत्त्व सोडण्यापूर्वी कोहलीला बीसीसीआयमधून आला होता फोन; पण धुडकावली मोठी ऑफर
हेही पाहा-