भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण अनुभवत आहे. सर्वच आघाड्यांवर तो जगातील कोणत्याही क्रिकेटपटूच्या पुढे आहे.
धावांमध्ये कुठेही कमी न पडणारा हा भारताचा दिग्गज खेळाडू कमाईतही (Income) कुठेच कमी नाही. घड्याळे, स्पोर्ट्स शूज, कार, कपडे आणि हेडफोन्ससारख्या विविध ब्रॅंड्सचा कोहली अॅंबेसिडर आहे.
२०१८मध्ये याचमुळे फोर्बच्या यादीत त्याला स्थान मिळाले. विराटने गेल्या १२ महिन्यात २४ मिलीयन डाॅलर कमाई केली आहे. अगदी यावर्षी सुसाट फाॅर्ममध्ये असलेल्या नोवाक जोकोविचसारख्या दिग्गज टेनिसपटूलाही त्याने कमाईत मागे टाकले आहे.
विराट फ़्लॉयड मेवेदर, मेस्सी किंवा रोनाल्डोला कमाईत मागे टाकू शकत नाही कारण क्रिकेट हा मर्यादीत देशांत खेळला जातो. परंतु तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मात्र नक्की मागे टाकू शकतो.
२०१५मध्ये धोनीची (MS Dhoni) कमाई ३१ मिलीयन डाॅलर एवढी प्रचंड होती. आता ह्याच कमाईच्या आकड्याला विराट मागे टाकू शकतो.
विराटची सध्याची २४ मिलीयन डाॅलर कमाईतील २० मिलीयन डाॅलर ब्रॅंड्समधून तर ४ मिलीयन डाॅलर मॅच फीमधून आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–हा दिग्गज म्हणतो, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा नकोच
–का होतोय स्टिव स्मिथचा हा फोटो व्हायरल
–या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान
–टीम इंडियातून वगळल्यानंतर एमएस धोनी झाला या खेळाच्या स्पर्धेत सामील
–तब्बल ५५ वर्षांनंतर पुन्हा घडला तो इतिहास