लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी (२५ ऑगस्ट) भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. तसेच संघातील मध्यक्रमातील फलंदाज पुन्हा एकदा साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. परंतु एक मुख्य कारण आहे, ज्यामुळे विराट कोहली या फलंदाजांना संघाबाहेर करू शकत नाही. काय आहे ते कारण? चला जाणून घेऊया.
भारतीय कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे मध्यक्रमातील मुख्य फलंदाज आहेत. जर २०२० पासून या तिन्ही फलंदाजांची कामगिरी पाहिली तर, विराट कोहलीने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा पेक्षा कमी सरासरीने धावा केल्या आहेत. विराटने कमी डाव खेळले असले तरीदेखील तो ४०० चा आकडा देखील पार करू शकला नाहीये. तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने विराटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
काय म्हणतात आकडे?
जर २०२० पासून या तिन्ही फलंदाजांची कामगिरी पहिली तर, चेतेश्वर पुजाराने २३ डावात २५.०९ च्या ५५२ धावा केल्या आहेत. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने २२ डावात २५.७६ च्या सरासरीने ५४१ धावा केल्या आहेत. तर कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं तर विराटने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारापेक्षाही कमीच्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने १६ डावात २४.१८ च्या सरासरीने ३८७ धावा केल्या आहेत. यासह गेल्या २ वर्षांपासून तो शतक झळकावण्यास देखील अपयशी ठरला आहे. त्याने शेवटचे शतक बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते.
हेच कारण आहे की, विराट कोहली अजिंक्य रहाणेला आणि चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर करू शकत नाहीये. (Virat Kohli could not drop Ajinkya Rahane and Cheteshwar pujara form the team this is the main reason)
Reason why Kohli can't drop Rahane & Pujara :
His own batting average ! pic.twitter.com/qLTMfsZShs
— Varad Ralegaonkar (@varad_artistic) August 25, 2021
लीड्समध्ये सुरू असलेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. यामध्ये अजिंक्य रहाणेला १८, विराट कोहलीला ७ आणि पुजाराला अवघी १ धाव करण्यात यश आले होते. तर इंग्लंड संघाला पहिल्या दिवसाखेर १२० धावा करण्यात यश आले आहे. तसेच इंग्लंड संघाने पहिल्या डावात ४२ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये आता नवीन प्रयोग, ‘या’ लीगच्या सामन्यांमध्ये वापरला जाणार ‘स्मार्ट बॉल’!
रोहितमुळे इंग्लंडच्या ओपनरला जीवनदान, झेल टिपला असता तर वेगळी असती सामन्याची परिस्थिती!
भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर अंडरसन म्हणाला, ‘आम्ही तेच केलं जे करायचं होतं’; वाचा पूर्ण भाष्य






