इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ४०० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील १९१ धावांच्या आघाडीत भर पाडत भारताने दुसऱ्या डावात २५० धावांचा आकडा गाठला आहे. यादरम्यान अर्धशतकी खेळी करत विराट कोहलीने माजी भारतीय दिग्गजावर वरचढ ठरला आहे.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराटने ७ चौकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने १४९ चेंडू खेळले. अखेर इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले.
हे विराटचे कसोटी कारकिर्दीतील २५ वे अर्धशतक ठरले. तर ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याची ही त्याची ५२ वी वेळ होती. अशाप्रकारे तब्बल ५२ वेळा धावांची पन्नाशी पार करत विराटने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. त्याने कसोटी कारकिर्दीत ५१ वेळा हा पराक्रम केला होता. तसेच त्याने माजी भारतीय फलंदाज दिलीप वेंगसरकर यांची बरोबरी केली आहे. वेंगरसरकरांनी देखील त्यांच्या कसोटी कारकिर्दीत ५२ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांचा आकडा गाठला होता.
याबरोबरच विराटने धावांची पन्नाशी पार करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या मांदियाळीत संयुक्तपणे सहावे स्थान मिळवले आहे. याबाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, द वॉल राहुल द्रविड, लिटल मास्टर सुनिल गावसकर, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग विराटपेक्षा आघाडीवर आहेत.
कसोटीत सर्वाधिक वेळा ५० किंवा जास्त धावा करणारे भारतीय
११९ वेळा- सचिन तेंडूलकर
९९ वेळा- राहुल द्रविड
७९ वेळा- सुनिल गावसकर
७३ वेळा- व्हिव्हिएस लक्ष्मण
५५ वेळा- विरेंद्र सेहवाग
५२ वेळा- दिलीप वेंगसरकर, विराट कोहली
५१ वेळा- सौरव गांगुली
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईचा सरंपच! अश्विनची ‘ही’ कामगिरी पाहून समलोचकांनी दिली भन्नाट उपमा, तुम्हीही असंच म्हणाल
व्हिडिओ: उडता ऑली पोप..! हवेत सूर मारत पठ्ठ्याने पकडला अविश्वसनीय झेल, रहाणे बघतचं राहिला
इंग्लंडचा धोनी!! पुजारा आणि रोहितनंतर बेन फोक्सच्या चपळाईपुढे रिषभ पंतही गपगार