टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अखेर आपला पहिला विजय मिळाला आहे. अबुधाबीमध्ये बुधवारी (३ नोव्हेंबर) झालेल्या या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आपल्या तिसर्या सामन्यात भारतीय संघ जेव्हा विरोधी संघ अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवत होता, तेव्हा कर्णधार विराट कोहलीही मैदानावर आनंदात दिसला. यादरम्यान मैदानावर ‘मेरा नाम है लखन’ हे गाणे वाजले, तेव्हा विराटने ‘नृत्य’ करण्यास मागेपुढे पाहिले नाही. आता, त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सामन्यात धमाकेदार फलंदाजी करताना भारताने २१० धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. यादरम्यान, भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना कर्णधार विराट कोहली सीमारेषेजवळ चाहत्यांसमोर नाचताना दिसला.
https://twitter.com/Godkohli18/status/1456226135121928198
सामना सुरू असताना विराट क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेच्या दिशेने येत होता. यादरम्यान, स्टेडियम प्रशासनाने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी संगीताची व्यवस्था केलेली होती. त्यानंतर चित्रपट अभिनेता अनिल कपूरवर चित्रित केलेले ‘माय नेम इज लखन’ हे सुपरहिट गाणे वाजले आणि विराट कोहलीने मस्त ठेका धरला.
विराट नाचत असल्याचे चाहत्यांनी पाहिल्यावर त्यांच्यातही उत्साह संचारला आणि त्याच्याकडे पुन्हा एकदा नृत्य करण्याची मागणी करू लागले. जेव्हा काही चाहत्यांनी विराटचा हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला, तेव्हा त्याला चाहत्यांकडून खूप पसंती दिली जात होती.
Dance of Virat in " My name is Lakhan " song 😍❤
Love to see our cheeku in happy mood 🥰 pic.twitter.com/vgBIq927h2— 𝚃𝙰𝚁𝚄𝙻𝙰𝚃𝙰 𝚂𝙰𝚁𝙺𝙰𝚁 (@Taru_10_18) November 4, 2021
तत्पूर्वी, सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर आणि रविचंद्रन अश्विनच्या धारदार गोलंदाजीमुळे टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ टप्प्यातील गट २ मध्ये अफगाणिस्तानचा भारताने ६६ धावांनी पराभव करून आपल्या विजयाचे खाते उघडले.
भारताने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ सात गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकांत १४४ धावाच करू शकला. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने ३२ चेंडूत ३५ धावा केल्या, या खेळीत त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. तर करीम जनत २२ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी साकारली. आपल्या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारीही केली. पण संघाला ते विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
झम्पाच्या फिरकीची जादू! बांगलादेशविरुद्ध विकेट्सचे ‘पंचक’ पूर्ण करत तब्बल ४ मोठ्या विक्रमांना गवसणी