---Advertisement---

IND vs BAN: शाकिबच्या विकेट्सनंतर कोहलीचा शानदार डान्स, VIDEO व्हायरल

On: शनिवार, सप्टेंबर 21, 2024 9:56 PM
team-india-test
---Advertisement---

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटीत भारताची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. भारतीय संघ आता विजयापासून फक्त 6 विकेट्स दूर आहे. भारताने पाहुण्या संघाला 515 धावांचे लक्ष्य दिले आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशची धावसंख्या 158/4 आहे. भारत अजूनही 357 धावांनी पुढे आहे.

पहिल्या दिवशी रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) शानदार शतकापासून सुरूवात केली, तर दुस-या दिवशी जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) शानदार 4 विकेट्स आणि तिसऱ्या दिवशी शुबमन गिल (Shubman Gill) रिषभ पंतने (Rishabh Pant) शानदार शतक झळकावले आणि भारताला चांगल्या धावसंख्येवर पोहोचवले.

तत्पूर्वी बांगलादेशच्या डावातील 31व्या षटकात रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) चेंडूवर शाकिबने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटची कड घेतली आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने (Rishabh Pant) कोणतीही चूक न करता यष्टीच्या मागे अप्रतिम झेल घेतला. शाकिब आऊट आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अंपायरने रिव्ह्यू घेतला. मोठ्या पडद्यावर हा निर्णय भारताच्या बाजूने आला आणि संपूर्ण संघाने बाद झाल्याचा आनंद साजरा केला.

हे पाहून भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपला आनंद व्यक्त करण्यास न डगमगता मजेशीर डान्स केला. त्याचा डान्स व्हायरल झाला आहे. कोहलीने मैदानावर डान्स करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो आपल्या नृत्याने आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एका बापाला आणखी काय हवं! शुबमनला शतक करताना पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेना
आफ्रिकेविरूद्ध दुखापत झाली तरी खेळला राशिद, विजयानंतर मोठा खुलासा
रिषभ पंतच्या चेन्नई कसोटीतील शतकी खेळीनंतर प्रेयसीची रिऍक्शन व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---