2019 विश्वचषकानंतर आता भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. या तीन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची रविवारी(21 जूलै) निवड करण्यात आली. या तिन्ही संघांचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे.
काही दिवसांपूर्वी विराट या दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती घेणार असल्याचे बोलले जात होते. परंतू विराटने विश्रांती न घेता या दौऱ्यात खेळण्याची तयारी दाखवली. त्यामुळे त्याची या संपूर्ण दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.
आता असे वृत्त आले आहे की 2019 विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी विराटने विश्रांती घेण्यास नकार दिला आहे.
मिररने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की ‘त्याने विश्रांती घ्यावी असे खरंच सल्ले देण्यात आले होते. पण त्याने निर्णय घेतला की त्याच्या उपलब्धतेची संघाला गरज आहे. खेळांडूंची मनस्थिती(2019 विश्वचषकानंतर) खालावली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या वेळी संघापासून दूर राहण्याची त्याची इच्छा नव्हती.’
या संपूर्ण दौऱ्यासाठी बीसीसीआयने हार्दिक पंड्याला विश्रांती दिली आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी विश्रांती दिली असून त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
तसेच या दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघात नवदीप सैनी, राहुल चहर, दीपक चहर, श्रेयस अय्यर, मनिष पांडे अशा युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
विंडीज दौऱ्यासाठी असा आहे भारताचा संघ –
टी20 मालिका – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी.
वनडे मालिका – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
कसोटी मालिका – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एका इन्स्टाग्राम पोस्टचे विराट कोहलीला मिळतात एवढे कोटी, ऐकून व्हाल थक्क!
–या दोन खेळाडूंना वनडे संघात संधी न मिळाल्याने सौरव गांगुलीने व्यक्त केले आश्चर्य
–भारताचा माजी कर्णधार म्हणतो, ‘…तर धोनी अजूनही खेळू शकतो क्रिकेट’