भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिका नुकतीच पार पडली असून आता टी२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ वर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियात विरुद्ध मागील टी२० मालिकेत विजय मिळवलेला यजमान भारतीय संघ याही मालिकेत फेव्हरेट मानला जात आहे.
मात्र पहिल्याच सामन्यात त्यांची खराब सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय कर्णधार विराट कोहलीने घेतला. पण दुसर्याच षटकात सलामीवीर केएल राहुल त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या, पण कोहली त्या पूर्ण करू शकला नाही.
आदिल रशीदच्या गोलंदाजीवर झाला बाद
भारतीय संघाने या सामन्यासाठी नियमित सलामीवीर रोहित शर्माला आराम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिखर धवन आणि केएल राहुल ही जोडी सलामीला उतरली होती. मात्र दुसर्याच षटकात राहुल जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीवर भारताचा डाव सांभाळण्याची जबाबदारी होती. मात्र कोहलीने फलंदाजीला आल्यावर दुसर्या षटकातील आर्चरचे उर्वरित चेंडू सावधपणे खेळून काढले. मात्र पुढच्याच षटकात लेगस्पिनर आदिल रशीद गोलंदाजीला आला असता विराट कोहलीने त्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू नीटसा बॅटवर आला नाही, आणि त्यामुळे कोहलीचा फटका थेट मिड ऑफ वरील क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला. त्यामुळे कोहलीला भोपळाही न फोडता माघारी परतावे लागले.
https://twitter.com/IndianboyYash1/status/1370384908120518658
दरम्यान, सुरुवातीच्या या धक्क्यातून भारतीय संघ सावरूच शकला नाही. इंग्लंडच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे निर्धारित २० षटकात त्यांना केवळ ७ बाद १२४ धावांवर समाधान मानावे लागले.
भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २३ धावा देत ३ बळी पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
लिझेल लीचे शानदार शतक; तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचा भारतावर विजय, मालिकेतही घेतली आघाडी
अर्धवट नशेत असताना हर्षल गिब्जने दक्षिण आफ्रिकेला वनडे मिळवून दिला होता अविस्मरणीय विजय
आयपीएल २०२१ : ‘हा’ फलंदाज म्हणतो मला चेन्नई सुपर किंग्सकडून करायची आहे सलामीला फलंदाजी