भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्या लयीत परतण्यासाठी झगडत आहे. त्याला गेल्या ३ वर्षांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आलेले नाही. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात शुक्रवारपासून (०४ मार्च) मोहाली येथे पहिला कसोटी सामना (Mohali Test) खेळला जात आहे. हा सामना कोहलीसाठी सर्वार्थाने खास होता. कारण हा त्याचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना (Virat Kohli’s 100th Test) होता. त्यामुळे या खास सामन्यात शतकाचा दुष्काळ संपवत कोहली जुन्या रंगात परतेल, अशी सर्वांना अपेक्षा होता.
परंतु अखेर सर्वांचा अपेक्षाभंग झाला. कोहली साधे अर्धशतकही न करता बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने दिलेली प्रतिक्रिया (Captain Rohit Sharma’s Reaction) लक्षवेधी ठरली.
त्याचे झाले असे की, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले होते. परंतु केवळ ५२ धावांवर त्यांची जोडी तुटली. लहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर सुरंगा लकमलच्या हाती झेल देत रोहित २९ धावांवर बाद झाला.
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर कोहली फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. हनुमा विहारीसोबत मिळून त्याने आपल्या खेळीची संथ सुरुवात केली होती. विहारीसोबत मिळून त्याने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागिदारीला रंगत चढायला सुरुवात झाली असताना ४४ वा षटकाच्या चौथ्या चेंडूवर लसिथ एम्बुलडेनियाने विराटला ४५ धावांवर त्रिफळाचीत (Virat Kohli Bold On 45) केले. त्यामुळे फक्त ५ धावांनी दूर असतानाही कोहलीला अर्धशतकापासून वंचित राहावे लागले.
एम्बुलडेनियाने विराटला त्रिफळाचीत केल्यानंतर ड्रेसिंग रूममधून कोहलीची फलंदाजी पाहात असलेला कर्णधार रोहित मात्र खूप निराश झाला. आपण सुरुवातीला स्वस्तात विकेट गमावल्यानंतर मधल्या फळीकडून रोहितला मोठ्या खेळींची अपेक्षा होती. कोहली आणि विहारी यांचा मैदानावरही चांगला जम बसला होता. परंतु एम्बुलडेनियाने कोहलीला त्रिफळाचीत करत त्यांची जोडी तोडल्यानंतर रोहितचेही तोंड पडले. तो डोक्यावर हात ठेवत संताप व्यक्त करताना दिसला.
https://twitter.com/SportsHustle3/status/1499662535674728450?s=20&t=j8je_rN1i2j5c1VB6WvbYA
रोहितबरोबरच कोहलीलाही लवकर बाद झाल्याचे वाईट वाटत होते. विकेट गेल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर तो तोंड पाडून उभा असल्याचे दिसले. असे असले तरीही, विराटकडे पुढील दुसऱ्या डावात मोठी खेळी करण्याची संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या आधी १०० कसोटी खेळणारे ११ भारतीय दिग्गज माहित आहेत का? पाहा संपूर्ण यादी
वेस्ट इंडिजची विश्वचषकात विजयी सुरुवात, पहिल्यांदाच न्यूझीलंडला मायदेशात चारली पराभवाची धूळ
विराटने ३८ वी धाव करताच नावावर झाला मोठा विक्रम; यापूर्वी केवळ ५ भारतीयांनी केलाय कारनामा