इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्न पुन्हा एकदा तुटले आहे. या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या ताफ्यात निराशा पसरली होती. दरम्यान, या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये, विराट कोहलीसह संपूर्ण संघ निराश दिसून येत आहे. जे पाहून चाहत्यांचे हृदय तुटले आहे. दरम्यान, विराट कोहलीने आपल्या संघ सहकाऱ्यांना एक संदेश देखील दिला आहे.
हा संदेश देत असताना तो खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या चाहत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
विराट कोहलीने म्हटले की, “खरं सांगायचं तर २०१६ चा हंगाम आमच्यासाठी खूप खास होता. परंतु, या हंगामाचाही आम्ही तितकाच आनंद घेतला.आम्ही निराश झालो असलो, तरी देखील तुटलो नाही. सर्व खेळाडूंवर मला अभिमान आहे.” एलिमिनेटरचा हा सामना आयपीएल स्पर्धेत कर्णधार म्हणून विराट कोहलीचा शेवटचा सामना ठरला. आगामी हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करेल. परंतु, संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार नाही.
#RCBvKKR Dressing Room Emotions
A sudden end to a fine season campaign, Virat Kohli’s last match as full time captain of RCB, the team spirit that brought us until here, – raw emotions in the dressing room at the end of our #IPL2021 journey.https://t.co/UstexXNKIA#PlayBold
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) October 12, 2021
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने केल्या होत्या १३८ धावा
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ३३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार मारले होते. तर, देवदत्त पडिक्कलने १८ चेंडूंमध्ये २१ धावांची खेळी केली होती. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २० षटकांअखेर अवघ्या १३८ धावा करण्यात यश आले.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा जोरदार विजय
या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शूबमन गिलने १८ चेंडूंमध्ये सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने आणि सुनील नरेनने प्रत्येकी २६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
राशिद खानने सांगितली जागातील टॉप-५ टी२० क्रिकेटपटूंची नावे, ‘या’ दोन भारतीयांचा केला समावेश
केवळ ‘या’ गोलंदाजामुळे एलिमिनेटर सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला, माजी भारतीय क्रिकेटरचे वक्तव्य
रवी शास्त्रींनंतर कधी मिळणार टीम इंडियाला नवा प्रशिक्षक? महत्त्वाची माहिती आली समोर