बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीतील (Border Gavaskar Trophy) पहिला सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात पर्थच्या मैदानावर रंगला आहे. पहिल्याच दिवशी दोन्ही संघात गरमागरमी पाहायला मिळाली. पण ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म कायम आहे. घरच्या मैदानावर पहिल्या कसोटीत कोहली फ्लॉप झाला आणि आता ऑस्ट्रेलियातही त्याची बॅट शांत दिसली. गेल्या काही काळापासून कोहली केवळ बॅटनेच गप्प बसलेला दिसत नाही.
विराट क्षेत्ररक्षणातही 100 टक्के देण्यात फ्लाॅप ठरत आहे. गेल्या 2 वर्षांपासून तो झेल सोडण्यात तरबेज दिसत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये झेल सोडण्याच्या बाबतीत विराट कोहली पाकिस्तानचा माजी कर्णधार ‘बाबर आझम’च्याही (Virat Kohli) पुढे आहे. 2022 नंतर कोहलीने कसोटीत सर्वाधिक झेल सोडले आहेत. या कालावधीत, कोहलीने 26 वेळा 9 झेल सोडले आहेत, ज्यात त्याची झेल सोडण्याची टक्केवारी 34.61 राहिली आहे.
कोहलीने पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनचा (Marnus Labuschange) झेल सोडला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
One of the more extraordinary drops you’ll see! #AUSvIND pic.twitter.com/LdxmEYeWQx
— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2024
कसोटीत झेल सोडण्याच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुसऱ्या स्थानी आहे. वॉर्नरने 27 संधींमध्ये 9 झेल सोडले, ज्यात त्याची ड्रॉप टक्केवारी 33.33 आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कीगन पीटरसन (Keegan Petersen) तिसऱ्या स्थामी आहे. यानंतर बाबर आझम चौथ्या क्रमांकावर आहे. बाबरने 25 संधींमध्ये 8 झेल गमावले आहेत, ज्यामुळे त्याची झेल सोडण्याची टक्केवारी 32 राहिली आहे.
पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) फ्लॉप दिसला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना 150 धावांवर ऑलआऊट झाला. पण पहिल्या डावात कोहलीने 12 चेंडूत केवळ 5 धावा केल्या आणि 1 झेल देखील सोडला.
2022 पासून कसोटीत सर्वाधिक झेल सोडण्याची टक्केवारी (किमान 20 संधी)
विराट कोहली – 9 झेल सोडले – 26 संधींमध्ये (टक्केवारी 34.61)
डेव्हिड वॉर्नर – 9 झेल सोडले – 27 संधींमध्ये (झेल सोडण्याची टक्केवारी 33.33)
कीगन पीटरसन – 7 झेल सोडले – 21 संधींमध्ये (झेल सोडण्याची टक्केवारी 33.33)
बाबर आझम – 8 झेल सोडले – 25 संधींमध्ये (झेल सोडण्याची टक्केवारी 32)
जॅक क्रॉली – 19 झेल सोडले – 60 संधींमध्ये (झेल सोडण्याची टक्केवारी 31.67)
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO; “लिलावात कुठे जाणार आहेस?” विचारलेल्या प्रश्नावर रिषभ पंतने दिले उत्तर
IND vs AUS; केएल राहुलवर कारवाई करणार आयसीसी? नेमकं प्रकरण काय?
IND vs AUS; “लवकर बाद कर लंडनला…” विराट बाद झाल्यानंतर चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल!