भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याची लोकप्रियता नेहमी शिखावर असते. तो सध्या जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट म्हणून ओळखला जातो. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याच्या याच प्रसिद्धीचे आता आणखी एक उदाहरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक छायाचित्र व्हायरल होत असून, त्यामध्ये विराटवर निबंध लिहिण्यास सांगितले गेल्याचे दिसते.
A question for the English exam of 9th Standard.
Showing the picture from the hundred of Virat Kohli against Afghanistan in the Asia Cup. pic.twitter.com/j2bhv6p1pu
— Johns. (@CricCrazyJohns) March 25, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या छायाचित्रात विराटच्या टी20 शतकानंतरचे सेलिब्रेशन दिसत आहे. ही प्रश्नपत्रिका इयत्ता नववीची इंग्रजी विषयाची असून, विद्यार्थ्यांना ते छायाचित्र पाहून 200-300 शब्दांमध्ये निबंध लिहिण्याची सूचना केली गेली आहे. यापूर्वी देखील असेच एक छायाचित्र व्हायरल झालेले यामध्ये विराट व त्याची पत्नी अनुष्का यांच्या मुलीचे नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला होता.
विराट कोहलीने मागील वर्षी झालेल्या आशिया चषकात आपले पहिले टी20 शतक झळकावले होते. तीन वर्षांपेक्षा अधिकच्या कालावधीनंतर विराटला आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यात यश आलेले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने ही कमाल केली होती. विराटने या सामन्यात नाबाद 122 धावा केल्या होत्या.
विराट नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तसेच वनडे मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला होता. त्यानंतर आता तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. आरसीबी आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकलेला नाही. त्यामुळे यावेळी संघाला विजेते बनवण्याची मोठी जबाबदारी विराटच्या खांद्यावर असेल. आयपीएलच्या आगामी हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
(Virat Kohli Essay In 9th Class Exam Showing Picture Of His T20I Century)
महत्वाच्या बातम्या-
योगायोग असावे तर असे! 2008 ची सीएसके आणि WPL च्या मुंबई इंडियन्सचे जुळून आलेले जबरदस्त साधर्म्य
अफगाणिस्तान क्रिकेटचा सुवर्णदिन! इतिहासात प्रथमच नोंदवला पाकिस्तानवर विजय, नबी चमकला