जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी जवळपास एक महिना बाकी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान खेळला जाईल. या सामन्यात, भारतीय कर्णधार विराट कोहलीवर सर्वांची नजर असेल. कर्णधार म्हणून आतापर्यंत त्याला एकही आयसीसी करंडक जिंकता आलेला नाही. भारताकडून फक्त माजी कर्णधार एमएस धोनी आणि कपिल देव यांना आयसीसी ट्रॉफी जिंकता आली आहे.
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने २०० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. कर्णधारपदाच्या बाबतीत तो फक्त एमएस धोनी (३३२) आणि मोहम्मद अझरुद्दीन (२२१) च्या मागे आहेत. धोनीने भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली टी२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची पदवी दिली आहे. आयसीसीच्या तीन वेगवेगळ्या स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.
भारतीय संघाने १९८३ मध्ये प्रथम आयसीसी करंडक जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने वनडे विश्वचषकातील अंतिम सामन्यात विंडीजला पराभूत करून विजेतेपद जिंकलेले. कर्णधार म्हणून कपिलदेवचा हा २० वा सामना होता. एमएस धोनीबद्दल बोलताना त्याने कर्णधार म्हणून ७ व्या सामन्यात आयसीसी ट्रॉफी जिंकलेली. २००७ ध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले. या स्पर्धेपूर्वीच धोनील नुकतेच संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते.
अशी आहे आकडेवारी
विराट कोहली सामने जिंकून देण्याच्या बाबतीत भारताचा दुसरा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २०० पैकी १२८ सामन्यांमध्ये विजय तर ५५ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामध्ये तीन सामने टाय तर १० सामने अनिर्णित राहिले आहेत. दुसरीकडे सर्वाधिक यशस्वी भारतीय कर्णधार असलेल्या एमएस धोनीने ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करताना १७८ विजय मिळवले होते. तर, १२० सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागलेले.
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेच्या ‘या’ प्रशिक्षकाने केली कोरोनावर यशस्वीपणे मात
‘ही’ आहे भारतीय महिला संघाची ‘लेडी धोनी’, एकसारखीच आहे कहाणी
वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर ‘अशी’ होती हैदराबादमधील संघ सहकाऱ्यांची प्रतिक्रिया





