---Advertisement---

‘ही’ आहे भारतीय महिला संघाची ‘लेडी धोनी’, एकसारखीच आहे कहाणी

On: रविवार, मे 16, 2021 11:30 PM
---Advertisement---

बीसीसीआयने नुकतीच इंग्लंड दौऱ्यावर ७ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय महिला संघाची घोषणा केली. या संघांमध्ये झारखंडची युवा यष्टीरक्षक इंद्राणी रॉय हिला संधी देण्यात आली आहे. इंद्राणी हीची कहाणी देखील एमएस धोनीप्रमाणेच असून ती धोनीला आपला आदर्श मानते.

संघर्षातून पुढे आली इंद्राणी
इंद्राणी हिने वयाच्या १५ व्या वर्षे क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. क्रिकेट खेळत असल्याने ती शालेय अभ्यासात काहीशी मागे पडत होती. त्यामुळे वडिलांचा तिच्या क्रिकेट खेळण्याला विरोध होता. मात्र, प्रशिक्षकांनी मनधरणी केल्यानंतर तिच्या वडीलांनी तिला क्लब क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली. क्रिकेट खेळण्यासाठी ती इतर राज्यात देखील जात. याच दरम्यान आर.एन सिंग यांनी तिला झारखंडकडून खेळण्याचा प्रस्ताव दिला व ती झारखंडसाठी खेळू लागली.

इंद्राणी हिनेदेखील धोनीप्रमाणे रेल्वेकडून क्रिकेट खेळले आहे. ती काही वेळ बंगालच्या एकोणीस वर्षाखालील संघाचा भाग होती. २०१७ मध्ये बंगाल संघाबाहेर केल्यानंतर तिने इतर राज्यात खेळण्यासाठी प्रयत्न केले. सध्या ती झारखंडचे प्रतिनिधित्व करत आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये केली देखणी कामगिरी
इंद्राणी ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरीच वर्ष खेळल्यानंतर भारतीय संघात निवड झाली आहे. संयम आणि नैसर्गिक गुणवत्तेच्या आधारे तिने हा पल्ला गाठलेला दिसून येतो. इंद्राणीने मार्च-एप्रिल महिन्यात खेळलेल्या ८ वनडे सामन्यांमध्ये ७६ च्या सरासरीने ४५६ धावा ठोकल्या होत्या. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या संघात ती एकमेव नवीन खेळाडू आहे.

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.

इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेसाठीचा भारतीय महिला संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहाद्दूर.

महत्त्वाच्या बातम्या –

वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर ‘अशी’ होती हैदराबादमधील संघ सहकाऱ्यांची प्रतिक्रिया

आहा! आपल्या होणाऱ्या पत्नीसह मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू गोव्यात लुटतोय सुट्ट्यांचा आनंद; रोमँटिक फोटो केला शेअर

“त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवा किंवा मंगळावर, काहीही फरक पडत नाही”, दिग्गजाने एबीवर उधळली स्तुतीसुमने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---