इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात आरसीबीने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीच्या विजयाचा नायक शतकवीर विराट कोहली हा ठरला. विराटने शानदार शतक पूर्ण करत आपल्या संघाला प्ले ऑफ शर्यतीत कायम ठेवले. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर विराटने बोलताना आपले खरे लक्ष जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना असल्याचे स्पष्ट केले.
हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीला विजयासाठी 187 धावांचे आव्हान मिळाले होते. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे आरसीबीने हे लक्ष्य चार चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले. विराने 62 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर आपले शतक पूर्ण केले. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी बोलताना विराट म्हणाला,
“मला परिस्थितीनुसार खेळायला आवडते. अपारंपारिक फटके खेळण्यावर मी अजिबात भर दिला नाही. असे फटके खेळून मला माझी विकेट गमवायची नाही. आयपीएलनंतर आम्हाला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळेच तंत्रावर भर देणे गरजेचे आहे. जेव्हा मी महत्त्वाच्या सामन्यात प्रभाव पाडतो तेव्हा मला खूप आत्मविश्वास मिळतो.”
आयपीएल संपल्यानंतर अवघ्या दहा दिवसांच्या आतमध्ये भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. ओव्हल येथे सात जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सामना खेळला जाईल. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 2021 मध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडने पराभूत करत पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता.
(Virat Kohli Eyeing WTC Final Between IPL He Revealed After SRH Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटचे कौतुक कराच पण प्लेसिसचे योगदान विसरु नका! नेतृत्वासह फलंदाजीची वाहतोय धुरा
लखनऊने विराटच्या शतकानंतर ट्वीट करत माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, ‘आता युद्धासाठी तयार व्हा, गंभीर…’