आपल्या सर्वांना माहित आहे की, कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळवले जातील, तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे काही विक्रम कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होऊ शकतात.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके-
सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचे शतक म्हणजेच १०० शतके ठोकण्याचा विश्वविक्रम आहे. तर विराटच्या (Virat Kohli) नावावर आतापर्यंत ७० शतके आहे. म्हणजचे विराट सचिनचा विक्रम मोडण्यापासून आणखी ३० शतके दूर आहे. परंतु सचिनच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४९ शतकांपासून तो जास्त दूर नाही. जर क्रिकेट सुरु झाले, तर पुढील वर्षी विराट हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. विराटबद्दल बोलायचं झालं तर त्याने वनडेत आतापर्यंत ४३ शतके जडली आहेत. सचिनच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी त्याला केवळ ६ शतकांची आवश्यकता आहे.
भारतात वनडेत सर्वाधिक शतके करण्याच्या सचिनच्या विक्रमापासून विराट केवळ १ शतक दूर आहे. भारतात सचिनने २० तर विराटने १९ शतके ठोकली आहेत. क्रिकेट सुरु झाल्यानंतर विराट सचिनचा हा विक्रमदेखील सर्वप्रथम मोडू शकतो.
वनडेत सर्वात कमी डावात १२००० धावा-
वनडेत विराट सर्वात कमी डावांमध्ये १२००० धावा पूर्ण करणारा खेळाडू बनू शकतो. सचिनने (Sachin Tendulkar) हा विक्रम ३०० वनडे डावांमध्ये पूर्ण केला होता. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) ३१४ वनडे डावांमध्ये पूर्ण केला होता. विराटने आतापर्यंत २४८ सामने खेळताना २३९ डावांमध्ये ११, ८६७ धावा केल्या आहेत. हा कारनामा पूर्ण करण्यापासून विराट केवळ १३३ धावा दूर आहे.
खरंतर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये ८०००, ९०००, १०००० आणि ११००० धावा करण्याचा विक्रम मात्र विराटच्या नावावर आहे. त्याने १०००० आणि ११००० धावा करण्याच्या बाबतीत सचिनचा विक्रम मोडला होता.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक धावा आणि शतके-
यावर्षाच्या शेवटी भारतीय संघाने जर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, तर विराट ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके ठोकणारा सचिननंतरचा दुसरा भारतीय फलंदाज बनू शकतो. सचिन आणि विराटने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत प्रत्येकी ६ शतके ठोकले आहेत. सचिनच्या नावावर ऑस्ट्रेलियामध्ये २० सामन्यांमध्ये ३८ डावात १८०९ धावा आहेत. तर विराटने १२ कसोटी सामन्यांमध्ये २३ डावात १२७४ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे तो सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून ५३५ धावा दूर आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-यावर्षीच्या विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल ‘तीन’ अतिशय महत्त्वाचे पर्याय
-३ असे क्रिकेटपटू; ज्यांचे मैदानावर जखमी होऊन झाले निधन, एक आहे भारतीय
-८० पेक्षा जास्त सामने खेळून एकही षटकार मारु न शकलेले ३ भारतीय क्रिकेटर