भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी सगळ्या देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान अचानक कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. कोहलीच्या या निर्णयावर सर्व जगभरातून प्रतिक्रीया येत आहेत. कोहलीच्या कुटुंबीयांनीही यावर प्रतिक्रीया दिली आहे. विराट कोहलीचा भाऊ (Virat Kohli’s Brother) विकास कोहली (Vikas Kohli)ने इंस्टाग्रामवर कमेंट करत एक भावनिक संदेश (Vikas Kohli’s Emotional Reaction) लिहला आहे.
विराटने सोशल मिडीयावर शेअर केलेल्या राजीनाम्याच्या पोस्टवर प्रतिक्रीया देत विकासने म्हटलं आहे की, “तुझ्या या निर्णयाने आपल्या कुटुंबाला आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटला, आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. मी समजू शकतो की, अशा परिस्थीतीत राहणे काय आहे आणि आपल्या निर्णयातून सगळे शिकणे काय आहे. तू नेहमीच अभिमानाने आमची मान उंचावली आहेस. तू तुझ्या संघावर आणि स्वप्नांवर विश्वास ठेवलास. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत, देव तुझं कल्याण करो.”
याशिवाय विकासने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरीला विराट आणि अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच विराटची बहिण भावना कोहली-धिंग्रा हिनेही प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/CYwlLtzpYzJ/?utm_source=ig_web_button_share_sheet
विराट कोहलीने शनिवारी संध्याकाळी इंस्टाग्राम आणि ट्विटरद्वारे आपल्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. विराटने म्हटलं आहे की, ‘गेल्या सात वर्षात मी मेहनतीने सतत काम केले आहे. परंतु जर मला वाटत असेल की, सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने नेण्याचा मी प्रयत्न केला. माझा १२० टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.’
विराट कोहलीच्या या निर्णयानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रोहित शर्मानेही आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘या निर्णयामुळे मला धक्का बसला आहे.’ भारतीय संघातील इतर खेळाडूंनीही विराट कोहलीसाठी भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत. बीसीसीआयने विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.
व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’
नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याने ही कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विराटऐवजी केएल राहुलला या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बनवण्यात आले होते. पण विराटची अनुपस्थिती भारताला खूपच महागात पडली आणि त्यांनी हा सामना गमावला. त्यानंतर तिसऱ्या कसोटीतून विराटने संघात पुनरागमन केले, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. यानंतरच विराटने कसोटी क्रिकेट कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता विराटनंतर कोणाकडे भारतीय संघाच्या कसोटी संघाची कमान सोपवली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्याचे चेंडू म्हणजे बंदुकीच्या गोळ्या”; ‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धनचा फॅन बनला किवी दिग्गज
‘…तू नव्या पिढीचा नेता’; पाकिस्तानी मित्राने विराटच्या राजीनाम्यानंतर केली भावनिक पोस्ट
श्रीलंका दौऱ्यात ‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणे, पुजाराची सुट्टी निश्चित! ‘हे’ तरुण शिलेदार घेऊ शकतात जागा
हेही पाहा-