कोणत्याही खेळात त्यांचे चाहते हे अत्यंत भावनिक दिसून येतात. संघाचा पराभव अथवा संघाविषयी वाईट शब्द ते सहन करू शकत नाहीत. नुकतेच इंडोनेशियातील एका फुटबॉल सामन्यात दोन संघाच्या चाहत्यांमध्ये जोरदार भांडण होऊन शेकडो चाहत्यांनी आपले प्राण गमावले होते. आता भारतात देखील नुकतीच एक भयंकर घटना समोर आली आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली व भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांच्या चाहत्यांत झालेल्या भांडणातून एकाची हत्या करण्यात आलीये.
तमिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील पोयूर गावात ही दुर्दैवी घटना घडली. या गावातील ती विग्नेश आणि धर्मराज हे दोन मित्र क्रिकेटशौकीन होते. विग्नेश हा रोहित शर्मा व पर्यायाने मुंबई इंडियन्सचा तर, धर्मराज हा विराट कोहली आणि आरसीबीचा चाहता आहे. या दोघांमध्ये सातत्याने क्रिकेटविषयी चर्चा होत असते.
किलापालुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (11 ऑक्टोबर) विग्नेश व धर्मराज हे मल्लुर येथील सिडको इंडस्ट्रियल एरियाच्या मैदानात बसले असताना क्रिकेटविषयी चर्चा करत होते. दोघांनी देखील मद्य प्राशन केले असल्याने, त्यांची चर्चा वादात बदलली. मुंबई इंडियन्सचा समर्थक असलेल्या विग्नेशने धर्मराज याच्यासह विराट कोहली व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची खिल्ली उडवली. त्यावेळी हा राग सहन न झाल्याने धर्मराज याने काचेची बाटली विग्नेशच्या डोक्यात मारली. त्यानंतर त्याने क्रिकेट बॅटने देखील त्याच्यावर हल्ला केला. विग्नेश मृत झाला आहे हे लक्षात आल्यानंतर धर्मराजने तेथून पळ काढला. त्यानंतर त्याला काही वेळाने जेरबंद करण्यात आले.
उच्चशिक्षित असलेला विग्नेश लवकरच सिंगापूर येथे नोकरीसाठी रवाना होणार होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिटनेसमध्येही विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड! ‘या’ 23 भारतीय खेळाडूंनी केलीये एनसीएची वारी
अरे हे काय, कॅप्टन रोहितने तर पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग इलेवनच सांगून टाकली!






