कॅमबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना बुधवारी(२ डिसेंबर) कॅनबेरा येथे झाला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने खास विक्रम केला आहे. विराटने या सामन्यात २३ धावा करताच वनडेमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
वनडेमध्ये हा टप्पा पार करणारा तो भारताचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे, तर एकूण सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने १२ हजार धावांचा टप्पा २५१ व्या वनडे सामन्यातील २४२ व्या डावात खेळताना पार केला आहे.
त्यामुळे विराट हा सर्वात जलद १२ हजार धावा करणाराही क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने ३०९ वनडे सामन्यांच्या ३०० डावांमध्ये १२,००० धावा पूर्ण केल्या होत्या.
विशेष म्हणजे विराट हा वनडेमध्ये ८०००, ९०००, १०००० आणि ११००० धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणाराही क्रिकेटपटू आहे.
या क्रिकेटपटूंनी केले आहेत १२ हजार वनडे धावा –
वनडे क्रिकेटमध्ये विराटच्या आधी सचिन तेंडुलकर (१८४२६), कुमार संगकारा (१२२३४), रिकी पाँटिंग(१३७०४), सनथ जयसुर्या(१३४३०) आणि माहेला जयवर्धने (१२६५०) यांनी १२ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. यातील जयसुर्या, संगकारा आणि जयवर्धने श्रीलंकेकडून खेळले तर सचिन भारताकडून आणि पाँटिंग ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.
वनडेत सर्वात जलद १२ हजार धावा पूर्ण करणारे क्रिकेटपटू (डावांच्या तुलनेत)
२४२ डाव – विराट कोहली
३०० डाव – सचिन तेंडुलकर
३१४ डाव -रिकी पाँटिंग
३३६ डाव – कुमार संगकारा
३७९ डाव – सनथ जयसुर्या
३९९ डाव – माहेला जयवर्धने
महत्त्वाच्या बातम्या –
चिन्नप्पापट्टी ते टीम इंडिया असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
इशारा देऊनही पाकिस्तानचे आणखी ३ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; न्यूझीलंड सरकार उचलणार कठोर पाऊल?