सेंच्युरियन । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या सामना फीमधून २५% रक्कम कापण्यात येणार आहे.
तसेच त्याला सामन्यादरम्यान योग्य न वागल्यामुळे १ demerit point ही देण्यात आला आहे. हा आयसीसीच्या खेळाडूंसाठी असलेल्या आचारसंहितेमधील २. १.१ गुन्हा आहे.
BREAKING: Virat Kohli has been fined for breaching the ICC Code of Conduct.
More ➡️ https://t.co/zRJ74iOlX1 pic.twitter.com/xMH5dTKQsi
— ICC (@ICC) January 16, 2018
सोमवारी विराट २५व्या षटकात जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव सुरु होता तेव्हा पंच मायकेल गॉ यांच्याशी हुज्जत घालताना दिसला. यापाठीमागे पावसामुळे खेळाला झालेला विलंब आणि अंधुक प्रकाश आधी करणे होती. परंतु विराटची देहबोली यावेळी योग्य नव्हती. असे आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
काल जेव्हा पावसामुळे सामना थांबला तेव्हा विराट नाराज दिसत होता.
जेव्हा पाऊस थांबल्यावर सामना पुन्हा सुरु झाला तेव्हा ५ षटके खेळल्यावर सामना पुन्हा थांबला. यावेळी सामना थांबवायला खराब प्रकाश हे कारण देण्यात आले.
तत्यामुळे कर्णधार कोहली रागानेच मैदानातून बाहेर गेला. तसेच थेट सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या रूममध्ये जाऊन नाराजगी व्यक्त केली.
https://twitter.com/iamkhurram12/status/952918841247453185?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fmahasports.co.in%2Findia-vs-south-africa-virat-kohli-complains-to-icc-match-referee%2F