बेंगलोर। काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात पार पडलेल्या सामन्यात बेंगलोरला 5 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्याचबरोबर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीवर या सामन्यात झालेल्या एका चुकीमुळे दंडाची कारवाई झाली आहे.
या सामन्यात बेंगलोरने षटकांची गती कमी राखल्याने विराटला 12 लाख रूपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.
याबद्दल आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की “आयपीएलच्या किमान षटकांची गती न राखल्यामूळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. आचार संहितेखाली ही या मोसमातील संघाची पहिलीच चुक आहे. यासाठी विराटवर 12 लाख रूपयांच्या दंडाची कारवाई झाली आहे.”
या सामन्यात विराटने 18 धावा केल्या होत्या. पण त्याला आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादित अव्वल येण्यासाठी फक्त 2 धावा कमी पडल्या. या यादित रैना अव्वल स्थानी आहे. रैनाच्या 4669 धावा आहेत, तर विराटच्या 4667 धावा आहेत.
कालच्या सामन्यात बेंगलोरने चेन्नई समोर 205 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान चेन्नईने एमएस धोनी आणि अंबाती रायडूच्या अर्धशतकांच्या जोरावर सहज पार केले.
विराटचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सध्या गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे. त्यांनी आत्तापर्यंत 6 सामन्यांपैकी फक्त 2 सामने जिंकले असल्याने त्यांचे 4 गुण आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्ज 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप
-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने
-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने
-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची
-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी
-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड
-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला
-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला
-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान