इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना मॅंचेस्टर येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला २६० धावांचे आव्हान मिळाले होते. त्याच्या प्रतिउत्तरात भारतीय संघाने आपले पहिले तिन्ही फलंदाज झटपट गमावले. सध्या खराब फॉर्ममधून चाललेल्या विराट कोहलीसाठी हा सामना देखील तसाच राहिला. तो पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.
पुन्हा एकदा विराट अपयशी
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २५९ धावा उभारल्यानंतर भारतीय संघाला सामना व मालिका जिंकण्यासाठी २६० धावा कराव्या लागणार होत्या. भारतासाठी रोहित शर्मा व शिखर धवन यांनी सलामी दिली. शिखर केवळ १ धाव बनवून बाद झाला. त्यानंतर विराट फलंदाजीसाठी आला. त्याने तीन सणसणीत चौकार मारत चांगली सुरुवात केली. मात्र, नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या रिस टोप्लीचा बाहेर जाणारा पहिला चेंडू त्याने छेडण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. तो दुसऱ्या सामन्यातही १६ धावांवर बाद झालेला. पहिल्या सामन्यात रोहित व शिखर यांनी भारताला दहा गड्यांनी विजय मिळवून दिलेला. मात्र, सहभागी झाला नव्हता.
मागच्या पाच सामन्यात विराट अपयशी
विराट २००८ पासून भारतीय संघासाठी खेळत आहे. मात्र त्याच्यावर ही वेळ पहिल्यांदाच आली आहे की, तो सलग पाच वनडे डावांमध्ये २० पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्याने मागील पाच वनडेत ८,१८,००, १६ व १७ केल्या आहेत. या मालिकेपूर्वी झालेल्या एका कसोटीत व टी२० मालिकेतही तो यशस्वी ठरला नव्हता. तसेच विराट नोव्हेंबर २०१९ असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ही ठोकू शकला नाही. विराट या मालिकेनंतर होणाऱ्या वेस्टइंडीज दौऱ्यावरही सहभागी होणार नाही. त्यामुळे आता तो थेट आशिया कपमध्ये खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिकसाठी इंग्लंड ठरतयं ‘बेस्ट’, क्रिकेटच्या सर्व प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी इथेच केलीये
जडेजाचे कौतुक करताना समालोचकाने वापरले ‘गौरवास्पद’ शब्द; म्हणाले “तो”…
तू चुकतोय; कर्णधार रोहित शर्माच्या ‘या’ निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटरने मुरडले नाक