भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली बऱ्याच वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याची बातमी आली होती. तो सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाचा भाग असू शकतो, असं बोललं जात होतं. मात्र, आता विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. बातमीनुसार, विराट कोहली दुखापतीचा बळी ठरला आहे. कोहलीची मान मुरगळली आहे. त्यामुळे त्याचं सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात खेळणं कठीण झालं आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, विराट कोहलीच्या मानेला दुखापत आहे. यासाठी त्यानं इंजेक्शनही घेतल्याचं बोललं जातंय. तो रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे निवडकर्ते यावर जेव्हा काही अपडेट देतील तेव्हाच गोष्टी स्पष्ट होतील. सूत्रांनुसार, विराट कोहली निश्चितच दिल्ली संघात सामील होईल आणि उपलब्ध असल्यास तो खेळूही शकतो. तो 21 आणि 22 जानेवारी रोजी दिल्ली संघासोबत सराव करणार आहे.
विराट कोहलीनं रणजी ट्रॉफीमध्ये शेवटचा सामना 2012 मध्ये खेळला होता. तेव्हापासून तो त्याच्या स्थानिक संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला नाही. अलिकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीसह सर्व भारतीय फलंदाजांची कामगिरी खूपच खराब होती. यामुळे सर्वांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू रणजी ट्रॉफी खेळताना दिसू शकतात.
भारतीय कर्णधार रोहित शर्मानं मुंबईच्या रणजी संघासोबत सरावालाही सुरुवात केली आहे. मात्र तो मुंबईकडून खेळेल की नाही, याबाबत स्पष्टता नाही. रिपोर्ट्सनुसार, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दिल्ली संघाचं नेतृत्व करणार आहे. याशिवाय यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल देखील रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसू शकतात.
हेही वाचा –
आयपीएल 2025 पूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू दुखापती
करुण नायर नाही, या खेळाडूला मिळेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी! कारण जाणून घ्या
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत ‘अ’ संघ या टीमविरुद्ध सामना खेळणार