साउथँम्पटन। आयसीसी 2019 विश्वचषकात शनिवारी(22जून) भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात द रोज बॉल स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेतील लेव्हल 1च्या नियमाचे उल्लंखन केल्याप्रकरणी भारताचा कर्णधार विराट कोहलीला मॅच फीच्या 25 दंड करण्यात आला आहे.
आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात या बद्दल म्हटले आहे की विराटने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.1 चे उल्लंखन केल्याचे आढळले आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यात अनावश्यक अपील केल्याप्रकरणी आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यात 29 व्या षटकात विराटने मैदानावरील पंच अलीम दार यांच्याकडे जाऊन आक्रमकपणे पायचीतचे अपील केले होते.
विराटने त्याची चूक मान्य केली असून सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी सुनावलेली शिक्षा मान्य केली आहे.
त्याचबरोबर विराटला दंडाबरोबरच एक डिमिरिट पॉइंटही देण्यात आला आहे. त्याचा हा सप्टेंबर 2016 मध्ये आयसीसीने सुधारित आचारसंहिता लागू झाल्यापासूनचा दुसरा डिमिरिट पॉइंट आहे. याआधी त्याला 15 जानेवारी 2018 ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान 1 डिमिरिट पॉइंट मिळाला होता.
याबरोबरच याच सामन्यात तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अफगाणिस्तानचा फलंदाज हजरततुल्लाह झझाईला पायचीत देण्याची अपील रद्द करण्यात आल्याने विराटने नाराजी व्यक्त केली होती.
याबद्दल त्याने पंचाची चर्चाही केली होती. यावेळी पंचानी झझाईला नाबाद दिले होते. त्यानंतर भारताने रिव्ह्यू घेतला होता. पण रिव्ह्यूमध्यही झझाईला नाबाद देण्यात आले होते.
#ViratKohli has been found guilty of breaching the ICC Code of Conduct.#CWC19https://t.co/tqYof1z8RI
— ICC (@ICC) June 23, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–३२ वर्षांनंतर असा पराक्रम करणारा शमी दुसराच भारतीय गोलंदाज
–स्टम्पिंग किंग एमएस धोनीने रचला इतिहास, केला नवा विश्वविक्रम
–ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड नंतर विश्वचषकात असा पराक्रम करणारा भारत केवळ तिसराच संघ