---Advertisement---

जिंकलस भावा! विराट कोहलीच्या सामाजिक कार्यात आणखी एक भर, पशू-पक्ष्यांच्या मदतीसाठी आला धावून

On: रविवार, एप्रिल 4, 2021 9:34 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाच्या अनेक विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले आहे. मैदानात आक्रमक असणारा हा खेळाडू मैदानाबाहेर उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेला खेळाडू आहे. तो सामाजिक कार्य करत नेहमीच चाहत्यांचे मन जिंकत असतो. अशातच आणखी एका मोठ्या सामाजिक कार्याची भर पाडली आहे.

विराट कोहलीने पशूंच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. विराट कोहलीने यापूर्वी देखील ‘विराट कोहली फाऊंडेशन’ तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. अशातच त्याने आता विवाल्डिस एनिमल हेल्थ आणि मुंबईच्या एनजीओ सोबत मिळून मुंबईच्या बाहेर पशू गृह बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्याने ट्विट करत दिली आहे.

हे सामाजिक उपक्रम मालाड आणि बोईसरमध्ये राबवण्यात येणार आहे. मालाडमध्ये बनवण्यात येणाऱ्या पशू गृहात कुत्रे आणि मांजर सारख्या प्राण्यांना दुखापतीतून बाहेर येईपर्यंत आसरा दिला जाईल. त्यासोबतच त्यांना होणाऱ्या दुखापतीवर मोफत उपचार देखील केला जाईल.

तसेच बोईसरमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या पशू गृहात या प्राण्यांना राहण्यासाठी आसरा देण्यात येणार आहे. येथे, नेत्रहीन, अपंगत्व आलेल्या पशू प्राण्यांना राहण्याची सोय होणार आहे. तसेच विराट कोहली फाऊंडेशन तर्फे अँबुलेंस सेवा देखील पुरवण्यात येणार आहे.

आयपीएल स्पर्धेसाठी विराट कोहली कर्णधार असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सज्ज झाला आहे. येत्या ९ एप्रिल रोजी आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघामध्ये रंगणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

चेन्नई संघासाठी यंदा ‘हे’ खेळाडू ठरू शकतात ट्रम्पकार्ड, संघाच्या प्रशिक्षकानेच केला खुलासा

टेबल टेनिसमध्येही पुजाराच्या डिफेन्सने फोडला दीपक चहरला घाम, पाहा व्हिडिओ

आठ वर्षांपूर्वी विराटच्या विकेटसह बुमराहने घेतली होती आयपीएलमध्ये रॉयल एन्ट्री; आता म्हणतोय…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---