---Advertisement---

आशिया चषकातील ‘विराट’ प्रदर्शनाचा कोहलीला फायदा, टी20 क्रमवारीत 14 स्थानांची उडी

On: बुधवार, सप्टेंबर 14, 2022 4:27 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा आशिया चषक 2022 द्वारे जुन्या फॉर्मात परतला आहे. त्याने आशिया चषकात दमदार फलंदाजी प्रदर्शन केले. तो या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज राहिला. त्याच याच प्रदर्शनाचा फायदा त्याला आयसीसीच्या ताज्या टी20 क्रमवारीत झाला आहे. विराटने फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत लांब उडी मारली आहे. 

विराटने (Virat Kohli) आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने 2 अर्धशतके आणि एका शतकाच्या जोरावर संपूर्ण हंगामात 276 धावा फटकावल्या आहेत. 5 सामने खेळताना त्याने या धावा केल्या आहेत. यादरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध त्याची बॅट चांगली तळपली होती. या सामन्यात त्याने नाबाद 122 धावा चोपल्या होत्या, जी त्याची हंगामातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली.

याच धमाकेदार प्रदर्शनाचा फायदा त्याला टी20 क्रमवारीत झाला आहे. विराटने पुरुषांच्या फलंदाजी टी20 क्रमवारीत थेट 14 स्थानांची प्रगती केली आहे.

विराट आयसीसी फलंदाजांच्या टी20 क्रमवारीत (ICC T20 Ranking) 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. आशिया चषकापूर्वी तो 33 व्या स्थानावर होता. आता विराटच्या खात्यात 599 गुण जमा झाले आहेत. तो भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून फक्त एका स्थानाने आणि 7 गुणांनी मागे आहे. रोहित 606 गुणांसह चौदाव्या क्रमांकावर आहे.

तर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान अव्वलस्थानी कायम आहे. तो आशिया चषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही राहिला होता. त्याने 6 सामन्यात 281 धावा केल्या होत्या. या प्रदर्शनानंतर त्याचे आयसीसी फलंदाजी क्रमवारीतील गुण 810 झाले आहेत. रिझवाननंतर ऍडेन मार्करम 792 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात टॉप-15 मध्ये आहे विराट
यासह विराट क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात आयसीसी फलंदाजी क्रमवारीत टॉप-15 मध्ये असणारा फलंदाज बनला आहे. तो आता टी20 क्रमवारीत 14व्या स्थानावर आला आहे. वनडे क्रमवारीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रमवारीत 12 व्या स्थानावर त्याचा ताबा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! संघनिवडीच्या बैठकीत संजूचे नावही घेतले नाही; बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा
जेव्हा ‘बॉल आउट’द्वारे भारताने पाकिस्तानला दिला होता धोबीपछाड, 3-0ने जिंकला होता सामना
आयपीएल 2023पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड! जयवर्धनेंचा प्रशिक्षकपदावरून राजीनामा, कारण…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---