भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर शुक्रवार रोजी (२६ मार्च) रोजी दुसरा वनडे सामना पार पडला. हा सामना पाहुण्या संघाने ६ विकेट्सने खिशात घातला. यासह वनडे मालिका १-१ ने बरोबरीवर आली आहे. यादरम्यान इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्स याच्याबद्दल पंचांनी दिलेल्या एका निर्णयावर भारतीय संघाने नाराजी व्यक्त केली.
यावेळी मैदानी पंच नितीन मेनन आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात एक मजेशीर प्रसंग घडला. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना २५ व्या षटकापर्यंत इंग्लंड १ बाद १६७ धावा अशा स्थितीत होता. त्यापुढील षटक टाकण्यासाठी भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आला.
भुवनेश्वरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टोक्सने मिड विकेटच्या दिशेने साधारन शॉट मारला आणि तो २ धावा घेण्यासाठी पळाला. पहिली धाव यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तो दुसरी धाव पूर्ण करत होता. इतक्यात कुलदीप यादवने चेंडू अडवला आणि थेट यष्टीवर थ्रो केला. त्याचा थ्रो अचूकपणे यष्टीला लागला आणि बेल्स उडून बाजूला पडल्या. तोवर स्टोक्सदेखील क्रिजवरील सीमारेषेपर्यंत पोहोचला होता.
यामुळे मैदानी पंच पेचात पडले. त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेल्यानंतर त्यांनाही स्टोक्स बाद आहे का नाबाद? हे अचूक सांगता आले नाही. अखेर स्टोक्स नाबाद असल्याचे घोषित केले गेले.
https://twitter.com/vprashant4/status/1375455367694479360?s=20
यानंतर कर्णधार विराट स्वत: पंच मेनन यांच्याजवळ गेला आणि त्यांना स्टोक्सबद्दलच्या निर्णया संदर्भात समजूत घालू लागला. मात्र मेनन यांनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. हे पाहून थोडावेळ विराट हताश झाल्याचे दिसला. मात्र नंतर त्याला स्वत:लाच हसू फुटले.
https://twitter.com/criccrazyshreya/status/1375463421064343560?s=20
३३ धावांवर पहिले जीवनदान मिळाल्यानंतर स्टोक्सने भारतीय गोलंदाजांना चांगलेच चोपले. ५२ चेंडूत १० षटकार आणि ४ चौकार मारत ९९ धावा केल्या. शेवटी भुवनेश्वरनेच रिषभ पंतच्या हातून ३५.२ षटकात त्याला झेलबाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
शतक सोडा स्टोक्स अर्धशतकाच्याही नजीक गेला नसता, पंचांचा ‘तो’ निर्णय बरोबर का चूक? तुम्हीच ठरवा
मिडल ओवरमध्ये कमी धावा ते पावप्लेमध्ये विकेट्सची उणीव; वाचा दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची कारणे
बॅटिंग मास्टर टू कॅच मास्टरची तयारी! आयपीएलपुर्वी इशान करतोय क्षेत्ररक्षणाचा कसून सराव, पाहा फोटो






