---Advertisement---

बॅटिंग मास्टर टू कॅच मास्टरची तयारी! आयपीएलपुर्वी इशान करतोय क्षेत्ररक्षणाचा कसून सराव, पाहा फोटो 

On: शनिवार, मार्च 27, 2021 1:38 PM
Ishan Kishan
---Advertisement---

‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखला जाणारा इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. ९ एप्रिल रोजी चेन्नई येथील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने या हंगामाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक फ्रँचायझीचे खेळाडू नेटमध्ये कसून सराव करताना दिसत आहेत. यात मुंबई संघाचा धाकड फलंदाज इशान किशन याचाही समावेश आहे. नुकताच मुंबईने त्याचा सराव करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

खास बाब अशी की, या फोटोत इशान फलंदाजी नव्हे तर क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसत आहे. फलंदाजीत हातखंडा असलेला २२ वर्षीय इशान यष्टीमागे शानदार झेल घेण्यातही तरबेज आहे. मात्र आता तो क्षेत्ररक्षण विभागातही स्वत:ला पारगंत बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरुन दिसून येते.

मुंबई इंडियन्सने इशानचा क्षेत्ररक्षण करतानाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘यष्टींच्या मागे आणि सीमारेषेजवळ.. इशान सर्वत्र झेल पकडू शकतो.’

https://www.instagram.com/p/CM35CYosrx9/?utm_source=ig_web_button_share_sheet

पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघात प्रतिभाशाली खेळाडूंचा भरणा आहे. त्यातही सर्वोत श्रेयस्कर फलंदाजांमध्ये इशानचे नाव आवर्जुन घेतले जाते. गतवर्षी आयपीएल २०२० मध्ये त्याने १४ सामने खेळताना तब्बल ५१६ धावा चोपल्या होत्या. यात ४ अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएल २०२१ मध्येही तो आपल्या दमदार फलंदाजीची छाप सोडेल.

महत्त्वाच्या बातम्या-

वर्ल्डकप सुपर लीग: दुसरी वनडे जिंकत इंग्लंड अव्वलस्थानी विराजमान, भारत टॉप-५ च्याही खाली

मिडल ओवरमध्ये कमी धावा ते पावप्लेमध्ये विकेट्सची उणीव; वाचा दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची कारणे

इंग्लिश फलंदाजांनी चोप चोपलं, तरीही का दिली नाही हार्दिकच्या हाती बॉलिंग? कॅप्टन विराट म्हणतो…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---