---Advertisement---

ज्या मैदानात १८ वर्षांपूर्वी विराटने भावाबरोबर सामना पाहिला त्याच मैदानात झाला त्याचा मोठा सन्मान

On: शुक्रवार, सप्टेंबर 13, 2019 5:01 PM
---Advertisement---

काल(12 सप्टेंबर) दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने(डीडीसीए) त्यांचे माजी अध्यक्ष दिवंगत अरुण जेटली यांच्या स्मरणार्थ दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडीयमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडीयम असे केले. तसेच या स्टेडीयममधील एका स्टँडला भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले.

हा सोहळा काल दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु स्टेडीयमच्या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पार पडला.

या कार्यक्रमात अरुण जेटली स्टेडीयमच्या एका स्टँडला विराटचे नाव देण्यात आल्यानंतर विराट म्हणाला, ‘मला कधीही वाटले नव्हते की माझा एवढा मोठा सन्मान होईल. याबद्दल काय बोलू माहित नाही. आज येथे माझी कुटुंबीय उपस्थित आहेत. माझी पत्नी अनुष्का, माझा भाऊ-वहिनी इथे आहेत.’

तसेच विराट यावेळी एक जूनी आठवण सांगताना म्हणाला, ‘2001 च्या दरम्यान इथे झिम्बाब्वे विरुद्ध एक सामना झाला होता. तेव्हा त्या सामन्याचे दोन तिकीट्स माझे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी मला दिले होते. मला आठवते मी आणि माझ्या भावाने हा सामना स्टेडीयममध्ये जाऊन पाहिला होता.’

‘तेव्हा मी मैदानाजवळ असणाऱ्या जाळीच्या जवळ जाऊन जवागल श्रीनाथ यांची स्वाक्षरी मागत होतो. ही गोष्ट आठवून मी माझ्या भावाला म्हटलो आपण किती दूरपर्यंत आलो आहोत. आज माझ्या नावाने त्याच स्टेडीयममध्ये एक पॅव्हिलियन असणे ही मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे.’

त्याचबरोबर अरुण जेटलींबद्दल विराट म्हणाला, ‘मी अरुण जेटलीजींच्या कुटुंबियांना सांगितले की जग त्यांना वेगळ्याप्रकारे ओळखते पण मी त्यांना एक व्यक्ती म्हणून ओळखतो. ते माझ्या वडीलांच्या निधनानंतर माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला आधार आणि धैर्य दिले. आज एक महत्त्वपूर्ण दिवस आहे.’

तसेच विराटने हा सन्मान मिळाल्यानंतर ट्विट केला आहे की ‘डीडीसीए आणि बीसीसीआय माझा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. हे पॅव्हेलियन मला माझ्या आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या प्रवासाची आठवण करुन देईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आशा आहे, या पॅव्हेलियनमुळे पुढील क्रिकेटपटूंच्या युवा पिढीला प्रेरणा मिळेल.’

काल या कार्यक्रमासाठी केंद्रिय क्रिडामंत्री किरण रिजिजू, भारतीय संघातील आजी-माजी खेळाडू देखील उपस्थित होते.

https://twitter.com/RajatSharmaLive/status/1172356290040852481

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा या सामन्यात असणार कर्णधार

प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा गिरिश एर्नाक पहिला महाराष्ट्रीयन खेळाडु

जो रुटने हा मोठा पराक्रम करत मिळवले कूक, तेंडूलकर सारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment