---Advertisement---

VIDEO: अहमदाबादमध्ये दिसली विराटची दिलदारी! सामन्यानंतर केलेल्या ‘त्या’ कृत्याची सोशल मीडियावर चर्चा

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (13 मार्च) समाप्त झाला. हा सामना अनिर्णित राहिला. अशाप्रकारे रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ही मालिका 2-1ने खिशात घातली. अशाप्रकारे भारताने चौथ्यांदा प्रतिष्ठित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. त्याचवेळी या सामन्याचा नायक ठरलेला भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याची सामन्यानंतरची एक कृती चर्चेचा विषय ठरत आहे.

भारतीय संघाने या मालिकेतील पहिले दोन सामने आपल्या नावे केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला. महत्वपूर्ण अशा अखेरच्या सामन्यात पूर्णपणे फलंदाजांचे वर्चस्व राहिले. त्यामुळे हा सामना निर्णय राहिला. भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याला त्याच्या 186 धावांच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांची भेट घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 180 खेळी करणारा उस्मान ख्वाजा व यष्टीरक्षक ऍलेक्स केरी‌ यांनी विराटशी बराच काळ चर्चा केली. यावेळी त्यांना आपल्या जर्सी भेट दिल्या. त्याच्या या कृत्याचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होताना दिसतेय. यापूर्वी आयपीएलमध्ये देखील विराट युवा खेळाडूंना अशा प्रकारे आपली जर्सी भेट देताना दिसला होता.

या सामन्याचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाने ख्वाजा व ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर 480 धावा उभ्या केलेल्या. यानंतर भारतीय संघासाठी सलामीवीर शुबमन गिल व  विराट कोहली यांनी शक्य होत भारतीय संघाला 91 धावांची आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात संथ फलंदाजी करत सामना निर्णय राखण्याचा निर्णय घेतला. उभय संघांमध्ये आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल.

(Virat Kohli Gifts His Jersey To Usman Khawaja And Alex Carey After Ahmedabad Test)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---