आयपीएल 2024 मध्ये काल (दि. 9 मे) बंगळुरु आणि पंजाब यांच्यात झालेल्या अतिमहत्वाच्या सामन्यात आरसीबी संघाने विराट विजय संपादित केला. या विजयासह आरसीबीने यंदाच्या मोसमातील आपले आव्हान कायम ठेवले. तर, पंजाब संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 60 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीची 92 धावांची खेळी बंगळुरुसाठी निर्णायक ठरली. बंगळुरूच्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा डाव अवघ्या 181 धावांत आटोपला. पंजाबकडून रायली रुसो याने 61 धावांची झुंझार खेळी केली. परंतू त्याची झुंज अपयशी झाली. याच सामन्यात रुसो बाबत घडलेला एक किस्सा मात्र आता चांगलाच चर्चेत आहे. ( Virat Kohli gives it back to Rilee Rossouw mimics with gun-shot celebration Watch video )
242 धावांचा पाठलाग करत असताना प्रभसिमरन सिंगची विकेट लवकर गेली. त्यामुळे पंजाब संघाचे टेन्शन वाढले होते. मात्र त्यानंतर मात्र रायली रुसो आणि जॉनी बेअरस्टो यांनी तुफान फटकेबाजी केली आणि सामना पुन्हा पंजाबकडे झुकवला. यात रुसोने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून आरसीबीला दबावात आणले होते.
या सामन्यात रुसोने 27 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारासह 61 धावांची झुंझार खेळी केली. जेव्हा अर्धशतक झाले तेव्हा रुसोने एकदम हटके सेलिब्रेशन केले. अर्धशतकानंतर रुसोने बॅट खांद्यावर ठेवून भन्नाट सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनने मैदानावर प्रेक्षकही खूश झाले होते, परंतू विरुद्ध संघात तणावाचे वातावरण झाले होते.
वादळी अर्धशतकानंतर पुढे मात्र रुसो 61 धावांवर झेलबाद झाला. कर्ण शर्माच्या 9 व्या षटकात रुसोला माघारी जावे लागले. तेव्हा विराट कोहलीने मात्र रुसोच्या सेलिब्रेशनला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. रुसोची विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने त्याची खोड काढत हटके सेलिब्रेशन केले. थेट बाण त्याच्या वर्मा मारला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Same same but different! 😁😉
Who amongst #ViratKohli or #RileeRossouw did it better? 👀
📺 | #PBKSvRCB | LIVE NOW | #IPLOnStar pic.twitter.com/eQyhqbE46X
— Star Sports (@StarSportsIndia) May 9, 2024
Russow’s Action
Virat Kohli’s Reaction 🔥😄#PBKSvRCB
pic.twitter.com/EMC4yXOUsx— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) May 9, 2024
Virat Kohli Celebration of Rilee Russo wicket
King Remember everything 👑🐐#RCBvsPBKS #ViratKohli pic.twitter.com/cC6ttupWB8
— Bagad Billa (@maitweethoon) May 9, 2024