---Advertisement---

बाद की नाबाद? विराटच्या विकेटने उडवला गोंधळ, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 6:01 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या हाती देण्यात आले होते, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात विवादास्पदरित्या बाद झाला आहे. ज्याने नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने कानपूर कसोटीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता, तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. तो एकही धाव न करता माघारी परतला.

तर झाले असे की, पहिल्या डावातील ३० वे षटक टाकण्यासाठी एजाज पटेल गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटचा चेंडू विराट कोहलीच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी गोलंदाज एजाज पटेल आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी पंचांकडे जोरदार मागणी केली. पंचांनी देखील त्याला बाद घोषित केले.

परंतु, विराट कोहलीने क्षणही वाया न घालवता डीआरएसची मागणी केली. कारण विराट कोहलीला माहीत होते की, चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला लागून गेला आहे. परंतु डीआरएस घेतले असता असे काहीच दिसून आले नाही आणि पंचांनी त्याला बाद घोषित केले.

पंचांच्या या निर्णयामुळे विराट कोहली नाराज दिसून येत होता. मैदानाच्या बाहेर जाण्यापूर्वी त्याने पंचांसोबत चर्चा केली. परंतु, त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याने ४ चेंडू खेळत एकही धाव केली नाही. तसेच भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर ७० षटकात ४ बाद २२१ धावा केल्या आहेत. यामध्ये मयांक अगरवाल १२० धावांवर फलंदाजी करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मायदेशात तळपे मयंक अग्रवालची बॅट; एक-दोन नव्हे कसोटीतील सगळीच शतके ठोकलीये भारतात, आजही…

आयपीएल २०२२ लिलावापूर्वी अहमदाबाद आणि लखनऊ संघ ‘या’ ३ खेळाडूंवर खर्च करु शकतात कोट्यावधी रुपये

कोण असेल राजस्थान रॉयल्सचा पुढील कर्णधार? कुमार संगकाराने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---