---Advertisement---

विराट कोहलीच्या ‘या’ फोटोवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून येतायेत मजेदार कमेंट, ‘हे’ आहे कारण

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत चार कसोटी सामन्याचा समावेश आहे. यापैकी दोन कसोटी सामने पार पडले आहेत. विराट कोहली एॅडलेडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातनंतर पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे. यादरम्यान त्याचा ही जिम मधील एक फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. त्याचबरोबर मजेदार कमेंट सुद्धा येत आहेत.

भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे. त्यामुळे सध्या विराट कोहली आपली पत्नी अनुष्का आणि आपल्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. मात्र या दरम्यान विराट कोहलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चाहत्यांकडून त्यावर मजेदार कमेंट येत आहेत.

https://twitter.com/imVkohli/status/1346394192222715904?s=19

विराट कोहलीने मंगळवारी जिममधे व्यायाम करतानाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामधे विराट कोहली उभा आहे. त्याचबरोबर त्याने दोन्ही हाताने विक्ट्री  ‘V’ इशारा करताना दिसत आहे. चाहते त्याच्या या फोटोचा संबंध त्याच्या पत्नीला होणार्‍या बाळासोबत जोडत आहे. एका चाहत्यांने त्याच्या अनुषंगाने अंदाज लावत म्हणले आहे, विराटच्या बाळाचा चार दिवसात जन्म होणार आहे, तर दुसर्‍याने बाळाचे वजन चार किलो आहे असा अंदाज बांधला आहे. अशा विविध प्रकारच्या कमेंट्स विराटने शेअर केलेल्या फोटो खाली येत आहेत.

https://twitter.com/FarziCricketer/status/1346403663716048896?s=19

https://twitter.com/Ittzz_Rahul/status/1346404203414003712?s=19

तत्पूर्वी विराट कोहली रजेवर असल्याने भारतीय संघाचे नेतृत्व प्रभारी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेकडे देण्यात आले. अजिंक्य रहाणेने नेतृत्व स्विकारताना मेलबर्न येथे झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग आहे. या स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक जास्त धावा अजिंक्य रहाणे केल्या आहेत. त्याच्यानंतर मयंक अगरवाल दुसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर आहे.

या स्पर्धेत विराट कोहलीने 706 धावा काढल्या आहेत. त्याने या स्पर्धेतील 10 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामधे त्याने 16 डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 आहे. तसेच त्याने 50.35 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आत्तापर्यंत या स्पर्धेत 16 डावात फलंदाजी करताना त्याचा स्ट्राईक रेट 59.19 राहिला आहे. त्याचबरोबर त्याने 1191 चेंडूचा सामना केला आहे. या 10 सामन्यात विराट कोहलीने 2 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. या सामन्यांत त्याच्या बॅट मधून 89 चौकार आणि 3 षटकार निघाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

20 वर्षांच्या तरुणाप्रमाणे मजबूत आहे सौरव गांगुलींच हृदय, उपचार करणाऱ्या डॉक्टर शेट्टींची प्रतिक्रिया

शार्दूल ठाकूरला तिसर्‍या कसोटीत संघात स्थान द्यावे, माजी खेळाडूंनी मांडले मत 
आयएसएल २०२० : बेंगळुरूला गारद करीत मुंबई सिटीची आघाडीवर मुसंडी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---