भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी गाबा येथे खेळली जात आहे. सामन्याचे दोन दिवस पूर्ण झाले असून, त्यात यजमान ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत दिसली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत स्थितीमुळे भारतीय चाहत्यांचा ताण वाढत आहे. दरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये किंग कोहली भज्जीसोबत डान्स करताना दिसतोय.
व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि हरभजन सिंग एकत्र उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोहली नाचू लागतो. डान्स केल्यानंतर कोहली जोरजोरात हसायला लागतो. कोहलीला हसताना पाहून हरभजन सिंगही हसायला लागतो. यानंतर कोहली आणि भज्जीमध्ये काहीतरी संवाद होतो.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हरभजननं कोहलीसोबत झालेल्या संभाषणाबद्दल सांगितलं. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना भज्जी म्हणाला, “कोहलीनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला जितेंद्र (अभिनेता) आला आहे? आणि मग कोहलीनं ‘नैनो में सपना, सपनो में सजना’ गाणं म्हणायला सुरू केलं. सुरुवातीला मला समजलं नाही की तो काय म्हणत होता. कारण तो दूर होता. तो स्वतःला थांबवू शकला नाही. तो जवळ आला आणि हुक स्टेप्स करू लागला.” तुम्ही विराटच्या या डान्सचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Meanwhile him around his people! pic.twitter.com/LGgvs9945l
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) December 14, 2024
गाबा येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया आतापर्यंत कमकुवत स्थितीत दिसून आली आहे. सामन्याचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात फलंदाजी करताना 7 बाद 405 धावा केल्या. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला, ज्यामध्ये केवळ 13.2 षटकंच खेळ झाला.
हेही वाचा –
रोहित-कोहलीपासून हार्दिक-बुमराहपर्यंत, भारताच्या स्टार क्रिकेटर्ससाठी 2024 हे वर्ष कसं राहिलं?
ट्रॅव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी, स्मिथनं संपवला शतकाचा दुष्काळ; असा राहिला गाबा कसोटीचा दुसरा दिवस
शतकासह ट्रॅव्हिस हेडचा गाबामध्ये मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू!