न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 104 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 95 धावा केल्या. षटकार मारून तो आपले शतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात बाद झाला, पण तोपर्यंत त्याने आपले काम केले होते, कारण भारत विजयाच्या अगदी जवळ होता. श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डावाची धुरा सांभाळत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता.
धरमशाला येथे विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या खेळीबाबत पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने विराट कोहलीचे भरभरून कौतुक केले आणि सांगितले की सध्या विराट कोहली त्याच्या इच्छेनुसार क्रिकेट चालवत आहे आणि त्यातूनच तो मोठा झाला आहे.
कामरान अकमल (Kamran Akmal) याने विराट कोहलीच्या खेळीचे कौतुक केले. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजशी बोलताना तो म्हणाला, “विराट कोहलीने ज्या प्रकारची फलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी आहे. मला वाटतं की, इथे दुसरा संघ असता तर त्यांनी सामना 60-70 धावांनी गमावला असता कारण न्यूझीलंड चांगली गोलंदाजी करत होता. मात्र विराट कोहलीने भारतीय संघाला सहज विजय मिळवून दिला. तो धावांचा पाठलाग करण्यात मास्टर आहे आणि मला वाटते की, तो त्याच्या इच्छेनुसार क्रिकेट चालवत आहे. मी म्हणायचो की क्रिकेटपेक्षा मोठा खेळाडू नाही, पण यावेळी विराट कोहली क्रिकेटपेक्षा मोठा झाला आहे.”
विराट कोहलीच्या या जबरदस्त खेळीमुळे भारतीय संघाने 20 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव केला आहे. भारताने विश्वचषक 2023 मध्ये सलग 5 सामने जिंकत गुणतालिकेत पहीला क्रमांक गाठला आहे. भारताचा पुढील सामना 29 ऑक्टोबरला इंग्लंडशी होणार आहे.
Virat Kohli has become bigger than cricket shocking statement of former Pakistan wicketkeeper
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेत ‘ही’ उंची गाठणं येड्या गबाळ्यांच काम नाही, सचिन-गेलला न जमलेली कामगिरी विराटने केली
अफगाणिस्तान पाकिस्तानलाही धक्का देण्याच्या तयारीत! चेपॉकवर रंगणार फिरकीचे युद्ध