जुलै १, पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंघमच्या ऍजबस्टन स्टेडियमवर पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना खेळला जाणार आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत हा सामना येतो. गतवर्षी कोरोनामुळे स्थगित झालेला हा सामना दोन्हीही संघांसाठी महत्वाचा असेल. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर असल्याने हा सामना जिंकत मालिकात खिशात घालण्याच्या प्रयत्नात असेल. तर इंग्लंडचा संघ हा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशात भारतीय संघाकडून मोठ्या धावा करण्याचा सर्वाधिक दबाव विराट कोहली याच्यावर असेल.
ऍजबस्टन (Highest Individual Inning At Edgbaston) येथे विराटचे (Virat Kohli) फलंदाजीतील आकडे प्रशंसनीय राहिले आहेत. तो सुनिल गावसकरांनंतर या मैदानावर भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज (१ सामना २०० धावा) आहे. तसेच या मैदानावर सर्वोच्च वैयक्तिक खेळी खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
विराटने २०१८ साली ऍजबस्टनमधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात २२५ चेंडू खेळताना १ षटकार आणि २२ चौकारांच्या मदतीने १४९ धावा केल्या होत्या. ही या मैदानावर कोणत्या भारतीय खेळाडूने केलेली सर्वोच्च वैयक्तिक खेळी होती. त्याच्याच नेतृत्त्वाखाली हा सामना भारतीय संघाने ३१ धावांच्या फरकाने गमावला होता. परंतु आता पुन्हा ऍजबस्टनच्या मैदानावर केवळ फलंदाज म्हणून विराटला आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजवावे लागेल.
विराटनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने या मैदानावर दुसरी सर्वोच्च वैयक्तिक खेळी खेळली आहे. त्याने या मैदानावर १२२ धावांची शतकी खेळी केलेली आहे. तर मोहिंदर अमरनाथ ७९ धावांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
ऍजबस्टन येथे भारतासाठी कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक खेळी-
१४९ धावा- विराट कोहली
१२२ धावा- सचिन तेंडुलकर
७९ धावा- मोहिंदर अमरनाथ
७८ धावा- गुंडप्पा विश्वनाथ
७७ धावा- एमएस धोनी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करणारा ३६वा कर्णधार असेल बुमराह, पहिल्या कॅप्टनचे नाव माहितीय का?
धोनीचा आदर्श घेऊन इंग्लंडशी भिडण्यासाठी नवा कर्णधार सज्ज, बुमराहची लक्षवेधी प्रतिक्रिया वाचा
मोठी बातमी! इंग्लंड विरुद्ध टी-२० आणि वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधार म्हणून…