क्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर आजपासून(29 फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली.
भारताने 33 षटकांच्या आतच 4 विकेट्स गमावल्या. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीच्याही विकेटचा समावेश आहे. विराटला 25 व्या षटकात 3 धावांवर असताना टीम साऊथीने पायचीत केले. या षटकात विराटला पायचीत केल्यानंतर साऊथीसह न्यूझीलंड संघाने जोरदार अपील केले होते. यावेळी मैदानावरील पंचांनीही विराट बाद असल्याचा निर्णयही दिला.
पण यानंतर विराटने पुजाराशी चर्चा करुन डिसिजन रिव्ह्यू सिस्टिमचा (डीआरएस) वापर करण्याचा निर्णय घेतला. मात्र रिव्ह्यूमध्येही विराट बाद असल्याचे स्पष्ट दिसल्याने भारताचा रिव्ह्यू वाया गेला, त्याचबरोबर विराटलाही विकेट गमवावी लागली.
कसोटीमध्ये पायचीत झाल्यानंतर डीआरएसचा वापर करण्याची विराटचीही 13 वी वेळ होती. पण या 13 रिव्ह्यूपैकी केवळ 2 वेळाच विराटचा रिव्ह्यू यशस्वी ठरला आहे. अन्य 11 वेळा विराटचा डीआरएस रिव्ह्यूचा वापर करण्याचा निर्णय चुकला आहे.
त्याचबरोबर 2016पासून विराटने फलंदाजी करताना कसोटीत 14 वेळा डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली आहे. त्यातील 9 रिव्ह्यू चूकीचे ठरले, 3 रिव्ह्यूमध्ये अंपायर्स कॉल(पंचांचा निर्णय) असा निर्णय आला. तर 2 केवळ रिव्ह्यू यशस्वी ठरले. त्याने याआधी शेवटचा यशस्वी रिव्ह्यू 2017ला श्रीलंका विरुद्ध कोलकाताला झालेल्या कसोटी सामन्यात घेतला होता.
आजपासून सुरु झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात विराट बरोबरच भारताने मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे यांच्याही विकेट्स स्वस्तात गमावल्या. अगरवाल आणि रहाणे प्रत्येकी 7 धावा करुन बाद झाले.
पण असे असले तरी पृथ्वी शॉ (54), चेतेश्वर पुजारा(54) आणि हनुमा विहारीने(55) अर्धशतकी खेळी करत भारताला 200 धावांचा आकडा पार करुन देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. मात्र हे तिघेही अर्धशतकी खेळी केल्यानंतर लगेचच बाद झाले.
धावा तर नेहमीचीच गोष्ट, कोहलीला आऊट करण्याचाही आगळावेगळा विक्रम जेव्हा होतो
वाचा👉https://t.co/x54YlVdfGb👈#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) February 29, 2020
कपिल देव म्हणतात, '…तर आयपीएल खेळण्याची गरज नाही
वाचा- 👉https://t.co/c1MGbpOON4👈#म #मराठी #cricket #TeamIndia #IPL2020 @therealkapildev— Maha Sports (@Maha_Sports) February 28, 2020