भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. या दौर्यात भारतीय संघाला तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरु झाला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने फलंदाजीला मैदानात येताच एका खास विक्रमाची नोंद केली आहे. विराट हा विक्रम करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळला जाणारा पहिला कसोटी सामना सेंचुरीयनच्या सुपस स्पोर्ट पार्कमध्ये आयोजित केला गेला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराटने या सामन्यात नाणेफेक जिंकताच एका खास विक्रमाची नोंद केली. विराट आता कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.
विराटच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. या सामन्यांपैकी ३० वेळा त्याने संघाला नाणेफेक जिंकवून दिली आहे. आता तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकणारा खेळाडू ठरला आहे. माजी दिग्गज कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांना विराटने या यादीत मागे टाकले आहेत.
यापूर्वी भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन आणि सध्याचा कसोटी कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत बरोबरीवर होते. पण, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराटने त्यांना मागे सोडले आहेत. मोहम्मद अजहरुद्दीनने त्यांच्या कसोटी कारकिर्दीत ४७ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्यापैकी २९ सामन्यांमध्ये संघाला नाणेफेक जिंकवून दिली होती.
भारताचा महान माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एमएस धोनी कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद अजरुद्दीन आणि विराटपेक्षा खूप कमी वेळा नाणेफेक जिंकला आहे, असे नाही. मात्र, तरीही त्याला या यादीत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. धोनीने ६० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि त्यापैकी २६ सामन्यांमध्ये त्याने संघाला नाणेफेक जिंकवून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
SAvsIND, Live: भारताला दुहेरी धक्का; अर्धशतकवीर मयंक अगरवाल पाठोपाठ पुजारा पहिल्या चेंडूवर आऊट
रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करताच भडकले भारतीय चाहते; दिल्या संतप्त प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशचा एक प्रतिभाशाली फिरकीपटू, मात्र ‘त्याला’ खेळायला मिळाला एकच कसोटी सामना
व्हिडिओ पाहा –