भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने सामन्याच्या सुरुवातील नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्मय घेतला. डावाची सुरुवात करण्यासाठी रोहितच्या साथीने शुबमन गिल मैदानात आला आणि संघाचा चांगली सुरुवात करून दिली. संघाने रोहितच्या रूपात पहिली विकेट गमावल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला. विराटने मैदानात पाय टाकताच मोठ्या विक्रमाची नोंद केली.
विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंकेविरुद्धच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात चांगल्या फॉरममध्ये दिसला. विराटची वनडे कारकीर्द मोठी असून श्रीलंकेविरुद्ध खेळण्याचा त्याच्याकडे चांगला अनुभव देखील आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराटने श्रीलंकन संघाविरुद्ध खेळलेला हा 50 वा सामना ठरला. विराट आता श्रीलंकन संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या भारतीयांच्या यादीत नव्याने जोडला गेला आहे. या यातीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), एमएस धोनी (MS Dhoni) आणि विरेंद्रे सेहवाग (Virendra Sehwag) असा दिग्गजांचा समावेश असून विराट सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिर वनडे सामने खेळणारे भारतीय फलंदाज
84 – सचिन तेंडुलकर
67 – एमएस धोनी
55 – सुरेश रैना
55 – विरेंद्र सेहवाग
55 – युवराज सिंग
53 – मोहम्मद अजहरुद्दीन
50 – विराट कोहली*
दरम्यान, यादीत विराट एकमेवर भारतीय खेळाडू आहे, जो सध्या संघाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करत आहेत. विराट कोहली सध्यात 34 वर्षांचा असून त्याच्याकडे अजून मोठी कारकीर्द बाकी आहे. अशात भविष्यात तो यादीत नक्कीच वरचा क्रमांक गाठू शकतो. विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रदर्शन पाहता विराट सचिन तेंडुलकर याच्याच 100 शतकांचा विक्रम मोडण्यासाठी दावेदार मानला जात आहे. त्याने आतापर्यंत 73 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघासाठी सलामीवीरांनी चांगली खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा () या 49 चेंडूत 42 धावा करून सर्वबाद झाला. रोहितने पहिल्या विकेटसाठी गिसोबत 95 धावांची भागीदारी पार पाडली. (Virat Kohli has played 50 ODIs against Sri Lanka in his ODI career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबचा वाघ ऑस्ट्रेलियात चमकला! विक्रम रचूनही कुणालाच लागला नाही पत्त्या, जाणून घ्याच
कोण आहे तो भारतीय धुरंधर ज्याने उडवलीये फाफ डू प्लेसिसची रात्रीची झोप? माजी कर्णधारानेच केलाय खुलासा