भारतीय संघ (Team India) आगामी दौऱ्यासाठी दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे (South Africa tour of India). भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात इतिहास रचण्याची संधी आहे. उभय संघात २६ डिसेंबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मागच्या २९ वर्षांपासून भारतीय संघाला दक्षिण अफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिका जिंकता आली नाही. अशात विराटच्या नेतृत्वातील संघ या मालिकेत विजय मिळवून अफ्रिकेत कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपवू शकतो. तसेच विराट देखील स्वतःच्या नावावर काही खास विक्रमांची नोंद करू शकतो.
विराट कोहलीचे आजपर्यंतचे दक्षिण अफ्रिकेतील प्रदर्शन पाहिले तर, ते अप्रतिम राहिले आहे. विराटने आतापर्यंत दक्षिण अफ्रिकेत खेळलेल्या कसोटी सामन्यांचा विचार केला, तर त्याने पाच कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये चांगल्या धावा देखील केल्या आहेत.
दक्षिण अफ्रिकेत खेळलेल्या पाच कसोटी सामन्यात त्याने ५५.८० च्या सरासरीने ५५८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचे दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या यापूर्वीचे दक्षिण अफ्रिकेतील आकडे पाहीले, तर असे वाटते की, आगामी मालिकेत देखील तो कमाल करू शकतो.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा विचार केला, तर विराट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण अफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांमध्ये दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड विराटच्या पुढे आहेत. लक्ष्मणने दक्षिण अफ्रिकेत ५६६ कसोटी धावा केल्या आहेत, तर द्रविडने या प्रकारात दक्षिण अफ्रिकेत ६२४ धावा केल्या आहेत. आगामी कसोटी मालिकेत विराटकडे या दोन दिग्गजांना मागे टाकण्याची संधी आहे.
दक्षिण अफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. सचिन एकमात्र भारतीय खेळाडू आहे, ज्याने दक्षिण अफ्रिकेत १००० कसोटी धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने दक्षिण अफ्रिकेत खेळलेल्या १५ कसोटी सामन्यांमधील २८ डावांमध्ये ११६१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ वेळा शतकी खेळी केली, तर तीन अर्धशतके केले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
जोस बटलरचे दिग्गज यष्टीरक्षकाने टोचले कान, ऍडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सोडले २ महत्त्वाचे झेल
बेस्ट ऑफ ऑल! अश्विनने सांगितले, कोणता भारतीय यष्टीरक्षक करतो स्पिनविरुद्ध सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षण?