नागपुर | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली नाबाद ६६ धावांवर खेळत आहे. विराटने ७४ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या आहेत.
याबरोबर या मैदानावर त्याने एक खास विक्रमही केला आहे. विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या या मैदानावर वनडेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्याचा मान विराटच्या नावावर झाला आहे.
विराटने या मैदानावर ५ वनडे सामने खेळताना ९१.६६च्या सरासरीने २७५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकं आणि एका शतकी खेळीचा समावेश आहे.
विशेष म्हणजे आज हा गोल्डन डकवर बाद झाल्यामुळे भविष्यात विराटचा विक्रम मोडणे धोनीसाठी तरी सध्या अशक्यच दिसत आहे.
या मैदानावर धोनीने ६ सामन्यांत २६८ धावा केल्या आहेत.
जामठाच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
२७३- विराट कोहली (२ अर्धशतकं* १ शतक)
२६८- एमएस धोनी (२ शतकं)
२०४ रोहित शर्मा
१८३- शेन वाॅटसन
१५८-सचिन तेंडूलकर#म #मराठी #INDvsAUS #Indvaus #Nagpur #Vidarbha— Sharad Bodage (@SharadBodage) March 5, 2019