बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. यंदाच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियात गेल्या दोन मालिका जिंकल्या आहेत. पण यावेळी टीम इंडियासाठी यंदाचे आव्हान सोपे असणार नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाला पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा करायचा असेल तर विराट कोहली हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल. असे ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार मायकल क्लार्कने म्हटले आहे. या मालिकेत विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या तर टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकू शकते. विराट कोहलीची बॅट बऱ्याच दिवसांपासून शांत आहे. गेल्या वर्षभरात त्याने आपल्या बॅटने एकही शतक झळकावलेले नाही. बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही कोहलीला मोठी खेळी खेळता आली नाही.
विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 25 कसोटींच्या 44 डावांमध्ये 2042 धावा आहेत. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये विराटच्या नावावर 13 कसोटी सामन्यांच्या 25 डावांमध्ये सहा शतके आणि 13 अर्धशतकांसह 1352 धावा आहेत.
Michael Clarke said, “Virat Kohli has to be the leading run scorer if India are to win the BGT”. (TAB). pic.twitter.com/WjLz5v35Qb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 16, 2024
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-0 असा पराभव केला तर तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक शतक ठोकणारे भारतीय फलंदाज
IND vs AUS: ‘जर मी त्याच्या जागी असतो…’, रोहित शर्माच्या ब्रेकवर सौरव गांगुलीची स्पष्ट प्रतिक्रिया
IND VS AUS; ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायची असेल तर टीम इंडियाला करावे लागतील हे 4 बदल