वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीरांच्या दमदार कामगिरीनंतर विराट कोहली याने भारताची फलंदाजी जबाबदारी सांभाळली. विराटने या सामन्यात शानदार शतक पूर्ण करत वनडे क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांचा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे यावेळी सचिन स्वतः मैदानावर हजर होता.
https://www.instagram.com/p/CzqlN0ORmdK/?igshid=MWpncXV1Z3QxZ2x3YQ==
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम आपल्या नावे केलेल्या विराटने या सामन्यात वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडीत काढला. विराटने बाद होण्यापूर्वी 117 चेंडूंमध्ये 113 धावांची खेळी केली. यामध्ये नऊ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. विराट व सचिननंतर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने आत्तापर्यंत वनडेत 31 शतके केली आहेत.
(Virat Kohli Hits 50th ODI Century First Man Who Achieved This Feat Broke Sachin Tendulkar Record)
महत्वाच्या बातम्या –
World Cup Semi Final: वानखेडेवर लागली सेलिब्रिटींची रांग! बेकहॅमपासून बॉलीवूड स्टेडियममध्ये
एक घाव, दोन तुकडे! वर्ल्डकपमध्ये जगात कुणालाच न जमलेला विक्रम रोहितच्या नावे, प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान