बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना वानखेडे स्टेडिअम येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करताना रोहितने भीमपराक्रम केला. तो विश्वचषकात अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज बनला.
रोहितचा विक्रम
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने डावातील पाचवे षटक टाकत असलेल्या ट्रेंट बोल्ट याच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. हा त्याचा डावातील तिसरा षटकार होता. हा षटकार मारताच त्याने विक्रमांचे मनोरे रचले. रोहित शर्मा विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. त्याच्या नावावर 27 षटकारांची नोंद झाली. त्याने या विक्रमात ख्रिस गेल याला मागे टाकले. गेलने विश्वचषकाच्या 2015 हंगामात 26 षटकार मारले होते.
Rohit Sharma now has MOST sixes in a single World Cup.
28* – ROHIT SHARMA???????? in 2023
26 – Chris Gayle????️ in 2015#CWC2023 #INDvsNZ pic.twitter.com/pqDGqVSNLX— Kausthub Gudipati (@kaustats) November 15, 2023
विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
28 – रोहित शर्मा (2023)*
26 – ख्रिस गेल (2015)
22 – ऑयन मॉर्गन (2019)
22 – ग्लेन मॅक्सवेल (2023)
21 – एबी डिविलियर्स (2015)
21 – क्विंटन डी कॉक (2023)
???? Milestone Alert ????
Captain Rohit Sharma has now hit the most sixes in Men’s ODI World Cup ????#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/rapyuF0Ueg
— BCCI (@BCCI) November 15, 2023
रोहित पहिला फलंदाज
याव्यतिरिक्त रोहितने आणखी एक विक्रम केला. तो असा की, विश्वचषकाच्या इतिहासात रोहित शर्मा 50 षटकार (Rohit Sharma 50 Sixes In World Cup) मारणारा पहिला फलंदाज बनला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी ख्रिस गेल आहे. त्याने 49 षटकार मारले होते. यादीत तिसऱ्या स्थानी ग्लेन मॅक्सवेल असून त्याने 43, तर संयुक्तरीत्या चौथ्या स्थानावर असलेल्या एबी डिविलियर्स आणि डेविड वॉर्नर यांनी प्रत्येकी 37 षटकार मारले आहेत.
विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
50 – रोहित शर्मा*
49 – ख्रिस गेल
43 – ग्लेन मॅक्सवेल
37 – एबी डिविलियर्स
37 – डेविड वॉर्नर
रोहितची खेळी
या सामन्यात रोहित शर्मा जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. त्याने 29 चेंडूत 47 धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. रोहित बाद झाला, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 1 बाद 71 धावा होती. (rohit sharma created history in world cup see records)
हेही वाचा-
India vs New Zealand: भारताने जिंकला Toss, सेमीफायनल जिंकण्यासाठी रोहित उतरवणार ‘या’ 11 खेळाडूंना मैदानात
IND vs NZ Pitch Controversy: सेमीफायनलपूर्वी मोठा वाद, BCCIवर खेळपट्टी बदलण्याचा आरोप; लगेच वाचा