वनडे विश्वचषक 2ं023 चा पहिला उपांत्य सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यजमान भारत व न्यूझीलंड या सामन्यात समोरासमोर येतील. भारतीय संघ बारा वर्षानंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्मा पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत त्याने पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
उपांत्य फेरी आधीच्या या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने रोहित शर्माला त्याच्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी प्रश्न विचारला. पत्रकाराने विचारले की, “ज्यावेळी तू पाठीमागे वळून पाहतो की, मैदानावर जाणारा एक लहान मुलगा आणि आज भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला दिग्गज, या प्रवासाकडे तू कसा पाहतोस.”
त्यावर रोहितने अत्यंत शांत डोक्याने उत्तर देत म्हटले,
“सध्या माझे पूर्ण लक्ष हे खेळावर आहे. माझ्या प्रवासाबद्दल मी विचार केला नाही. 19 नोव्हेंबर नंतर कदाचित याबाबत मी विचार करेल. हा पूर्ण व्यवसाय आहे. संघाला अंतिम ध्येयापर्यंत नेणे हेच सध्या आमचे काम आहेत.”
रोहितने याच पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले,
“सध्या संघातील वातावरण अत्यंत आनंदी आहे. सर्वांना आपापली जबाबदारी माहीत असून, ते तसेच मैदानात खेळ करत आहेत. राहुल द्रविड आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ हे देखील अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात.”
हा उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. रोहितचे देखील घरचे मैदान आहे. तसेच भारतीय संघातील सूर्यकुमार यादव, ईशान किशन व जसप्रीत बुमराह हे आयपीएलमध्ये याच मैदानावर खेळत असतात. याव्यतिरिक्त श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेट मुंबईसाठीच खेळतो.
(Indian Captain Rohit Sharma Speaks Before Semi Final Against Newzealand)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान