भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा मोठा सामना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ मैदानात कसून मेहनत करताना दिसून येत आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी तीन दिवसांचा इंट्रास्क्वॉड सराव सामना खेळला. ज्यामध्ये सर्वच खेळाडू चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले आहे. तसेच कर्णधार विराट कोहली देखील नेट्समध्ये तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार विराट सराव करताना दिसून येत आहे. या सराव सत्रात तो दर्शनीय शॉट खेळताना दिसून येत आहे. तसेच वेगवान चेंडूवर उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह मारताना दिसत आहे. दरम्यान त्याने गोलंदाजाच्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारला आहे. त्याच्या या जबरदस्त षटकाराला तिथे उपस्थित असलेले सर्व खेळाडू अचंबित होऊन पाहताना दिसत आहे.
Three sleeps away from the BIG GAME. 👍👍
How excited are you? 🙌 🙌#WTC21 #TeamIndia pic.twitter.com/nqaI6cf33H
— BCCI (@BCCI) June 15, 2021
कसोटी अजिक्यंपद अंतिम सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करण्याबरोबर भारतीय संघाने ३ दिवसांचा इंट्रास्क्वॉड सराव सामना खेळला. या सामन्यात शुबमन गिलने १३५ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ९४ चेंडूंमध्ये नाबाद १२१ धावांची खेळी केली.
तर दुसरीकडे न्यूझीलंड संघ देखील नुकताच विजेता ठरला आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत, न्यूझीलंड संघाने उल्लेखनीय कामगिरी करत १-० ने विजय मिळवला आहे. त्यामुळे चाहत्यांना कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. (Virat Kohli hitting Six on Ravindra Jadeja ball video went viral on social media)
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकाविरुद्धची फ्लॉप कामगिरी, ‘या’ खेळाडूंच्या टी२० विश्वचषकाच्या स्वप्नावर फेरेल पाणी!
ठरलं तर! ‘हाच’ दिग्गज श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचा महागुरु, गांगुलीचा शिक्कामोर्तब