---Advertisement---

VIDEO: दिलदार कोहली! हुड्डाने विकेटचे खातं उघडताच विराटने दिली जादूची झप्पी

deepak-hooda, virat-kohli
---Advertisement---

बुधवारी (९ फेब्रुवारी ) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत वेस्ट इंडिज संघाला ४४ धावांनी धूळ चारली. यासह ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान आपल्या कारकिर्दीतील दुसराच वनडे सामना खेळत असलेल्या दीपक हुड्डाने (Deepak Hooda) पहिला गडी बाद केला. त्यानंतर विराट कोहलीने जे काही केले , त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डाला दुसऱ्या वनडे सामन्यात देखील संधी देण्यात आली होती. या सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये देखील त्याचा जलवा पाहायला मिळाला. त्याने वेस्ट इंडिज संघासाठी महत्वाची खेळी करत असलेल्या ब्रुक्सला बाद करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला बळी घेतला. त्यानंतर माजी कर्णधार विराट कोहली त्याला मिठी मारताना दिसून आला होता.

हे नयनरम्य दृश्य वेस्ट इंडीज संघाची फलंदाजी सुरू असताना ३१ व्या षटकात पाहायला मिळाले. हे षटक टाकण्यासाठी दीपक हुड्डा गोलंदाजीला आला होता. षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने वेस्ट इंडिज संघासाठी महत्वाची खेळी करत असलेल्या ब्रुक्सला मोठा फटका खेळण्यासाठी चेंडू टाकला, परंतु ब्रुक्स त्या चेंडूवर मोठा फटका खेळू शकला नाही आणि सूर्यकुमार यादवच्या हातून झेलबाद झाला. कारकिर्दीतील पहिलाच बळी घेतल्यानंतर संघातील खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या तसेच विराट कोहली त्याला मिठी मारताना दिसून आला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा जोरदार विजय ..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं तर, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ९ बाद २३७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून शरमार्ह ब्रूक्सने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर अकील हुसेनने ३४ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्वाच्या बातम्या :

बीसीसीआयमध्ये पुन्हा भूकंप! महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने दिला राजीनामा; सविस्तर वाचा

VIDEO: डीआरएस घेण्याच्या बाबतीत हिटमॅनची धोनीला टक्कर; दुसऱ्या सामन्यातही अचूक राहिले निर्णय ‌

सनरायझर्स हैदराबादची आघाडी! आयपीएल २०२२ साठी लॉन्च केली जर्सी; सात वर्षांनी केला बदल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---