---Advertisement---

विश्वचषक २०१९: टीम इंडियाला पहिल्याच सामन्याआधी बसला जोरदार धक्का

On: रविवार, जून 2, 2019 2:53 PM
---Advertisement---

साउथँम्पटन। 2019 विश्वचषकाला जोरदार सुरुवात झाली आहे. या विश्वचषकात भारताचा सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार आहे. पण या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला आंगठ्याची दुखापत झाली आहे.

त्याला शनिवारी(1 जून) भारतीय संघाच्या सराव सत्रावेळी ही दुखापत झाली आहे. पण त्याच्या दुखापतीबद्दल अजून बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

काही रिपोर्टच्या अनुसार विराटच्या आंगठ्यावर लगेचच भारतीय संघाचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फर्हाट यांनी उपचार केले आहेत. तसेच विराटने ड्रेसिंगरुममध्ये परतताना बर्फाने भरलेल्या ग्लासमध्ये आंगठा ठेवला होता.

विराट हा भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आता विराटची दुखापत कितपत गंभीर आहे, हे पहावे लागणार आहे. त्याचबरोबर भारताच्या पहिल्या सामन्याला अजून तीन दिवस बाकी असल्याने विराट या दुखापतीतून लवकर सावरावा अशी सर्वांचीच आशा असेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

–श्रीलंकेविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडने केला मोठा पराक्रम

–विश्वचषक २०१९: या कारणामुळे आयोजकांना मागावी लागली चाहत्यांची माफी, तिकीटांचे पैसेही करणार परत

 –तब्बल १८३५ झेल आणि ८८५१ मीटरचा प्रवास करत आला आजच्या सामन्यातील चेंडू, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment