---Advertisement---

विराट कोहलीने त्याची विकेट घेणाऱ्या खलील अहमदची अशी उडवली खिल्ली, पहा व्हिडिओ

On: सोमवार, मे 6, 2019 4:12 PM
---Advertisement---

शनिवारी(4 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात आयपीएल 2019 मधील 54 वा सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने 4 विकेट्सने विजय मिळवला. तसेच त्यांचा या मोसमातील शेवटही गोड केला.

या सामन्यात हैद्राबाद संघाला पराभव स्विकारावा लागला असला तरी हैद्राबादचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने या सामन्यात चांगली कामगिरी करताना 37 धावांत 3 विकेट्स घेतल्या. या तीन विकेट्सपैकी एक विकेट ही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची होती.

खलीलने विराटला 16 धावांवर असताना बाद केले. विराटचा झेल यष्टीपक्षक वृद्धीमान सहाने घेतला. विराटला बाद केल्यानंतर खलीलने जोरदार जल्लोष केला. पण सामन्यानंतर त्याच्या या जोल्लोषाची मजामस्तीच्या मुडमध्ये असणाऱ्या विराटने गमतीशीरपणे खिल्ली उडवली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/JaipalReddy0521/status/1124935481462906880

https://twitter.com/sampath0272/status/1124746220801368064

शनिवारी झालेल्या या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 175 धावा केल्या होत्या. हैद्राबादकडून कर्णधार केन विलियमसनने 43 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. तसेच बेंगलोरकडून वॉशिंगटन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 176 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोर संघाची 3 बाद 20 अशी अवस्था असताना गुरकिरत मन आणि शिमरॉन हेटमेयरने अर्धशतकी खेळी केल्या. गुरकिरतने 65 आणि हेटमेयरने 75 धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी रचली आणि बेंगलोरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

बेंगलोरने या आयपीएल मोसमात 14 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत आणि 8 पराभव स्विकारले आहेत. तसेच त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यांच्या या साधारण कामगिरीमुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

प्लेऑफआधी चेन्नईला बसला मोठा धक्का, विश्वचषकातूनही बाहेर पडू शकतो हा खेळाडू

उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०१९ प्लेऑफबद्दल सर्वकाही…

दोन्ही सलामीवीरांनी एकाच वनडेत केल्या तब्बल १७० पेक्षा अधिक धावा, रचला विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment