---Advertisement---

विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या

On: बुधवार, डिसेंबर 2, 2020 8:29 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. भारतीय संघाने 27 नोव्हेंबर पासून सुरू झालेली तीन सामन्याची वनडे मालिका 2-1 या फरकानी गमावली. त्यामुळे आता भारतीय संघ राहिलेल्या टी-20 आणि कसोटी मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरेल. त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 17 डिसेंबर पासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून मायदेशी परतणार आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका 2-1 या फरकाने गमावली आहे. मात्र, पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने 300 धावांचा आकडा पार करूनसुद्धा पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या तिसर्‍या सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करताना विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विजय संपादन केला. मात्र, आता विराटच्या अनुपस्थित होणार्‍या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर सर्वांचे लक्ष लागले. कारण या तीन कसोटी सामन्यांपूर्वी विराट पालकत्व रजेवर जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला तीन मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल.

1. फलंदाजीसाठी खूप कमी पर्याय असणार

भारतीय संघ विराट उपस्थित नसल्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी कमकुवत होताना दिसेल. विराट हा फलंदाजीसाठी खूपच उत्कृष्ट असतो. कारण कोणत्याही सामन्यात हातातून जात असलेला सामना विराटच्या फलंदाजीने जिंकता येतो. त्यामुळे त्याचे भारतीय संघात असणे महत्वाचे असते. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या सामन्यात विराटने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

आगामी तीन कसोटीत विराटचे उपस्थित नसने हे भारतीय संघाला अडचणीत आणण्यासारखे आहे. विराटच्या जागेवर
फलंदाजी करण्यासाठी पहिला पर्याय हा केएल राहुल आहे. तो विराटच्या बरोबरीने नाही, पण जवळपास त्याच्या सारखी फलंदाजी करू शकतो.

2. विराटच्या अनुपस्थित मोडू शकते संघाचे व्यवस्थापन

ऑस्ट्रेलियाच्या मागील दौर्‍यात विराट हा उत्कृष्ट कर्णधार म्हणून पाहायला मिळाला होता. त्यावेळी विराटच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी पार पाडली होती. मात्र, यंदा उर्वरित तीन कसोटी सामन्यात विराटची कमतरता नक्कीच जाणवेल. कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाले, तर विराटच्या अनुपस्थित संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करताना दिसून येईल, परंतु अजिंक्य रहाणेला जास्त नेतृत्त्वाचा अनुभव नाही. त्यामुळे संघासाठी ही एक मोठी समस्या असणार आहे.

3. विरुद्ध संघाचा मानसिक दबाव

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा तो विरुद्ध संघातील फलंदाजांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर विराट क्षेत्ररक्षण करताना आपल्या विरुद्ध संघातील खेळाडूसोबत बोलताना असा प्रसंग निर्माण करतो की, विरुद्धसंघाला आपली रणनिती बदलावी लागते.

त्यामुळे विराटच्या तुलनेत अजिंक्य हा एकदम शांत आणि संयमी आहे. त्यामुळे अजिंक्य तसे काय करू शकणार नाही. त्यामुळे भारतापुढे ही एक समस्या उद्भवू शकते.

ट्रेंडिंग लेख-

लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्‍याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू

काय म्हणायचं आता! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मध्ये भारतीय संघाने उभारलेल्या तीन सर्वात ‘निच्चांकी’ धावसंख्या

 लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई

महत्त्वाच्या बातम्या-

तुम्ही मालिका जिंकली, आम्ही तुम्हालाच जिंकलं! भारताने वनडेत सर्वाधिक वेळा धूळ चारलेल्या संघांमध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश

भारताचा विजय आणि ऑस्ट्रेलियाच्या थेट काळजावर घाव!! इतिहासात पहिल्यांदाच कुणीतरी कांगारूंना त्यांच्याच राजधानीत लोळवलंय

फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्‍या स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---